Lalu Yadav IRCTC Scam : 'आयआरसीटीसी' घोटाळा: लालू, राबडी अन् तेजस्वी यादवांवर दोषारोप निश्चित!

दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून ७ आरोपींची निर्दोष मुक्तता
Lalu Yadav IRCTC Scam
राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. Pudhari
Published on
Updated on

IRCTC Scam Money Laundering Case : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. आयआरसीटीसी (IRCTC) मनी लाँड्रिंग प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांच्यासह एकूण ९ जणांवर न्यायालयाने अधिकृतपणे दोषारोप निश्चित केले आहेत. त्यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) कलम ३ आणि ४ अंतर्गत हे आरोप ठेवण्यात आले आहेत.दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने या प्रकरणात दिलासा देत इतर ७ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.

काय आहे प्रकरण?

लालू प्रसाद यादव केंद्रातील संयुक्‍त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारमध्ये रेल्वे मंत्री होते. त्‍यांच्‍या कार्यकाळात आयआरसीटीसीच्या दोन हॉटेल्सच्या संचालनाचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. या टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Lalu Yadav IRCTC Scam
CNR Rao SIR Notice : 'भारत रत्न' डॉ. सी.एन.आर. राव यांना कोणतीही नोटीस नाही; निवडणूक आयोगाचा खुलासा

सीबीआय प्रकरणातही यापूर्वीच दोषारोप सिद्ध

या प्रकरणातील गुन्हेगारी स्वरूपाच्या आरोपांची तपासणी 'सीबीआय' करत आहे. तर आर्थिक गैरव्यवहाराची (मनी लाँड्रिंग) चौकशी अंमलबजावणी संचालनालय (ED) करत आहे. यापूर्वी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव यांच्यासह इतर आरोपींवर दोषारोप निश्चित केले होते. न्यायालयाने त्यांच्याविरोधात फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

Lalu Yadav IRCTC Scam
Mundhwa Land Scam : पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल

प्राथमिक तपासात काय निष्पन्न झाले?

लालू यादव यांच्या देखरेखीखालीच रेल्वे अधिकाऱ्यांनी रांची आणि पुरी येथील आयआरसीटीसी हॉटेल्स लीजवर देण्यासाठी टेंडर प्रक्रियेत फेरफार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

Lalu Yadav IRCTC Scam
Supreme Court :'विवाहांमुळे व्यक्तीचे वैयक्तिक स्वांतत्र्य हिरावले जात नाही';वैवाहिक बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news