Lal Chowk Terror Attack: अनंतनागमधील लाल चौक भागात दहशतवादी हल्ला... एक पोलीस जवान शहीद

Lal Chowk Terror Attack
Lal Chowk Terror Attackpudhari
Published on
Updated on

Lal Chowk Terror Attack: दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमधील लाल चौक परिसरात कोकेरनाग रोडवर गस्तीवर असणाऱ्या पोलीस दलावर दहशवादी हल्ला झाला. या हल्ल्यात गंभीर झालेले पोलीस जवान हेड कॉन्स्टेबर आशिक हुसैन कुरेशी यांचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

Lal Chowk Terror Attack
Chandrapur Tiger Terror | वाघाची दहशत, वन कार्यालयासमोर भर पावसात ग्रामस्थांचा एल्गार; 5 तास ठिय्या आंदोलनानंतर जेरबंदीचा आदेश

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेड कॉन्स्टेबल आशिक हुसैन कुरैशी लाल चौकाच्या जवळून जाणाऱ्या कोकरनाग रस्त्यावर ड्युटीसाठी होते. अचानक एका गाडीत बसून आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला.

या गोळीबारात आशिक हुसैन गंभीर जखमी झाली होते. हल्ला करणारे दहशतवादी घटनास्थळावरून त्वरित फरार झाले. हल्ला झाल्यावर आशिक हुसैन यांच्या साथीदारांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना जवळच्या जीएमसी अनंतनाग रूग्णालयात पोहचवलं.

Lal Chowk Terror Attack
Pak Terror Kolhapur Connection | पाक दहशतवादी भट्टीचे कोल्हापूर कनेक्शन : दोन तरुणांची चौकशी

डॉक्टरांनी हेड कॉन्स्टेबल हुसैन यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र जखम गंभीर असल्यामुळं त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ३५ वर्षाचे हेड कॉन्स्टेबल आशिक हुसैन कुरैशी बडगामच्या बीरूचे रहिवासी होते.

आशिक हुसैन शहीद झाल्यावर पोलीस विभाग आणि त्यांच्या गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून नियमानुसार वैद्यकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Lal Chowk Terror Attack
Leopard Terror : पिठोरी सिरसगाव शिवारात बिबट्याची दहशत

सर्च ऑपरेशन सुरू

हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस आणि लष्कराच्या अतिरिक्त बलाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सुरक्ष दलांनी लाल चौक आणि आसपासच्या भागाची नाकाबंदी केली आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news