Leopard Terror : पिठोरी सिरसगाव शिवारात बिबट्याची दहशत

अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव शिवारात बिबट्याने शेळीचा फडशा पाडल्याची घटना
jalna news
पिठोरी सिरसगाव शिवारात बिबट्याची दहशतfile photo
Published on
Updated on

Leopard terror in the Pithori Sirasgaon area

शहापूर, पुढारी वृत्तसेवाः अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव शिवारात बिबट्याने शेळीचा फडशा पाडल्याची घटना रविवार, दि.५ रोजी उघडकीस आली.

jalna news
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात बोकड, बकरी ठार

दरम्यान, पिठोरी सिरसगाव शिवारात बिबट्याचा वावर असल्यामुळे परीसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यात भर म्हणजे रविवारी, दुपारी ४ वाजेच्या सुमारास बिबट्याने गट क्रमांक ८ मधील भोलेनाथ माने यांच्या शेतात बांधलेल्या शेळीचा फडशा पाडला. शेतकऱ्यांचे सुमारे २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

सध्या खरीप हंगामातील लागवड व पेरणीची कामे सुरू असून, शेतकरी आपल्या कामात व्यस्त आहेत भर दुपारी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याने पिठोरी सिरसगाव येथील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती शेतकऱ्यां कडुन वनविभागाला देण्यात आली असुन वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

jalna news
Leopard Attack | पोलादपूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news