नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या (National Center for Seismology) माहितीनुसार, आज सकाळी ७:२९ च्या दरम्यान आल्ची (लेह) पासुन १८६ किमी उत्तरेकडे चीन-भारत सीमा भागात भूकंपाचे तीव्र धक्के बसले. ४.३ रिश्टर स्केल (Richter Scale) एवढी त्याचीतीव्रता नाेंदली गेली आहे .यामुळे कोणतीही जीवीत आणि वित्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. याच्या अगोदरही लडाख या भौगोलिक भागात १६ मार्च रोजी भूकंपाचा हादरा बसला होता. ५.२ रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली होती.