Kia Carens CNG: किआ कॅरेन्स आता CNG मध्ये! जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

किआने आपली लोकप्रिय कार 'कॅरन्स' (Carens) सीएनजीमध्ये (CNG) देखील बाजारात आणली आहे.
Kia Carens CNG
Kia Carens CNGfile photo
Published on
Updated on

Kia Carens CNG

नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही किआ (Kia) कंपनीच्या गाड्या पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये पाहिल्या असतील. पण आता किआने आपली लोकप्रिय फॅमिली कार 'कॅरन्स' (Carens) सीएनजीमध्ये (CNG) देखील बाजारात आणली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहक सीएनजी कारला जास्त पसंती देत आहेत. हे लक्षात घेऊन, किआने ही नवीन सीएनजी कार सादर केली आहे. या नवीन Kia Carens CNG ची किंमत ११.७७ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

सीएनजी किटची वैशिष्ट्ये काय?

या व्हेरियंटमध्ये लावलेली सीएनजी किट कोणतीही 'आफ्टरमार्केट ॲटॅचमेंट' नसून ती 'डीलर-लेव्हल फिटमेंट' म्हणून सादर केली जात आहे. किआने यासाठी सरकारने प्रमाणित केलेली Lovato DIO किट वापरली आहे, जी ३ वर्षे किंवा १ लाख किलोमीटरच्या थर्ड-पार्टी वॉरंटीसह येते. या किटची किंमत ७७,९०० रुपये आहे, जी बेस पेट्रोल व्हेरियंटवर (किंमत १०.९९ लाख रुपये) लावली जाऊ शकते.

Kia Carens CNG
Maruti Suzuki Victoris: आली रे आली! मारुती सुझुकी व्हिक्टोरिस SUV; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

इंजिन आणि गिअरबॉक्स

कॅरन्स सीएनजीच्या इंजिन मेकॅनिझममध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात तेच १.५-लीटर 'नॅचरली ॲस्पिरेटेड' पेट्रोल इंजिन मिळते, जे ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. किआने अद्याप त्याचे पॉवर आकडे जाहीर केले नसले तरी, हे तेच इंजिन आहे जे त्याच्या स्मूथ परफॉर्मन्स आणि रिफाइन्ड नेचरसाठी ओळखले जाते.

कारची डिझाईन कशी आहे?

किआने या CNG मॉडेलमध्ये कोणतेही बाह्य बदल केलेले नाहीत. बॉडी-कलर्ड बंपर आणि डोअर हँडल्स, सिल्व्हर फिनिश असलेली 'टायगर नोज ग्रिल', रिअर स्पॉयलर, शार्क-फिन ॲन्टेना आणि हॅलोजन हेडलॅम्प्स व टेललॅम्प्स याला साधे पण प्रीमियम लूक देतात. ही कार R15 किंवा R16 स्टील व्हील्सवर धावते, ज्यांच्यासोबत फुल-साईज व्हील कव्हर्स दिलेले आहेत. साईजच्या बाबतीत कॅरन्स सीएनजीची लांबी ४,५४० मिमी, रुंदी १,८०० मिमी आणि उंची १,७०८ मिमी (रूफ रेल्ससह) आहे. २,७८० मिमीचा व्हीलबेस याला त्याच्या सेगमेंटमधील सर्वात प्रशस्त एमपीव्हींपैकी एक बनवतो.

६ आकर्षक रंग

किआ कॅरेंस CNG ६ आकर्षक रंगांमध्ये सादर केली गेली आहे. क्लिअर व्हाईट, स्पार्कलिंग सिल्व्हर, ग्रॅव्हिटी ग्रे, ऑरोरा ब्लॅक पर्ल, इम्पीरियल ब्लू, आणि प्यूटर ऑलिव. प्रत्येक रंगात ही एमपीव्ही वेगळा आकर्षक लूक देते.

Kia Carens CNG
New Hyundai Venue: 'फायटर जेट'सारखी रस्त्यावर धावणार SUV! न्यू ह्युंदाई वेन्यू' चे अनावरण; जाणून घ्या सर्व फीचर्स

वैशिष्ट्ये काय?

किआने CNG व्हेरिएंटमध्ये आवश्यक फीचर्स कायम ठेवले आहेत. यात की-लेस एंट्री, बर्गर अलार्म, इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल आरसे, रिअर व्ह्यू कॅमेरा, रिअर सनशेड कर्टेन्स आणि ड्रायव्हर सीट हाईट ॲडजस्टमेंट सारखे अनेक उपयुक्त फीचर्स दिले आहेत. सेफ्टीच्या दृष्टीनेही ही एमपीव्ही खूप मजबूत आहे. यात किआचे १० सेफ्टी पॅकेज देण्यात आले आहे, ज्यात ६ एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), हिल असिस्ट कंट्रोल (HAC), व्हेईकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट (VSM), ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, एबीएस (ABS), रिअर पार्किंग सेन्सर (Rear Parking Sensor) आणि हाईलाईन टीपीएमएस (Highline TPMS) सारख्या फीचर्सचा समावेश आहे.

या मॉडेल्स सोबत आहे स्पर्धा

भारतीय बाजारात किआ कॅरेंस CNG चा थेट मुकाबला Maruti Suzuki Ertiga CNG आणि XL6 CNG सोबत होतो. किआने अधिकृत मायलेजची माहिती जाहीर केलेली नाही, मात्र कंपनीचा दावा आहे की नियमित मॉडेलच्या तुलनेत जास्त इंधनाची बचत होईल आणि ही कार परवडणारी ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news