Maruti Suzuki Victoris: आली रे आली! मारुती सुझुकी व्हिक्टोरिस SUV; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
मोहन कारंडे
मारुती सुझुकीने नवी मध्यम आकाराची SUV व्हिक्टोरिस (Victoris SUV) भारतात सादर केली आहे.
Maruti Suzuki Victoris
ही Arena डिलरशिप पोर्टफोलिओतील फ्लॅगशिप SUV असून ब्रेझ्झाच्या वरच्या श्रेणीत येते. कंपनीने यासाठी “Got It All” हा टॅगलाईन वापरला आहे.
Maruti Suzuki Victoris
सेफ्टीबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या मारुती सुझुकीने यावेळी मोठा धक्का दिला आहे. व्हिक्टोरिसला 5-स्टार BNCAP क्रॅश टेस्ट रेटिंग मिळाले आहे.
Maruti Suzuki Victoris
मारुतीच्या कोणत्याही गाडीत प्रथमच लेव्हल-2 ADAS सिस्टीम देण्यात आली आहे. यामुळे ड्रायव्हिंग आणखी सुरक्षित होते.
Maruti Suzuki Victoris
SUV ला स्लीक आणि प्रोग्रेसिव्ह डिझाईन देण्यात आले आहे. व्हिक्टोरिसची लांबी 4,360 मिमी, रुंदी 1,655 मिमी आणि उंची 1,795 मिमी आहे. व्हीलबेस 2,600 मिमी आहे.
Maruti Suzuki Victoris
व्हिक्टोरिस 10 रंगांमध्ये (3 ड्युअल टोन आणि 7 मोनोटोन) उपलब्ध आहे. यात मिस्टिक ग्रीन आणि एटर्नल ब्लू हे दोन नवीन रंग देखील समाविष्ट आहेत.
Maruti Suzuki Victoris
LED हेडलॅम्प्स, कनेक्टेड टेल-लॅम्प्स, रूफ रेल्स आणि 17-इंच अलॉय व्हील्स, असा SUV ला दमदार लूक दिला आहे.