New Hyundai Venue: 'फायटर जेट'सारखी रस्त्यावर धावणार SUV! न्यू ह्युंदाई वेन्यू' चे अनावरण; जाणून घ्या सर्व फीचर्स

New Hyundai Venue
New Hyundai Venuefile photo
Published on
Updated on

New Hyundai Venue

नवी दिल्ली: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (HMIL) ने देशातील सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हीपैकी एक असलेल्या 'ह्युंदाई वेन्यू'च्या नवीन मॉडेलचे अनावरण केले आहे. नवीन पिढीतील व्हेन्यूचा आकार आणि उंची वाढली आहे. नवीन Venue साठी बुकिंग Hyundai डीलरशिप्स आणि ऑनलाईन २५ हजार इतक्या प्रारंभिक रकमेवर सुरु असून अधिकृत लाँच ४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

New Hyundai Venue
Maruti Suzuki Victoris: आली रे आली! मारुती सुझुकी व्हिक्टोरिस SUV; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

आकार आणि डिझाइनमध्ये बदल

नवीन पिढीच्या या वेन्यूमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. ही एसयूव्ही पूर्वीपेक्षा ४८ मिमी उंच आणि ३० मिमी रुंद आहे, त्याची लांबी ३,९९५ मिमी, रुंदी १,८०० मिमी आणि उंची १,६६५ मिमी आहे, तसेच व्हीलबेसही २० मिमीने वाढवण्यात आला आहे (नवीन व्हीलबेस: २,५२० मिमी). वेन्यूमध्ये 'क्वाड-बीम एलईडी हेडलॅम्प्स', 'ट्विन-हॉर्न एलईडी डीआरएल' आणि 'हॉरायझन-स्टाइल एलईडी टेल लॅम्प्स' देण्यात आले आहेत. 'डार्क क्रोम रेडिएटर ग्रिल' आणि १६ इंची 'डायमंड-कट अलॉय व्हील्स' एसयूव्हीला एक दमदार लूक देतात.

ही नवी वेन्यू 'Tech up. Go beyond.' या संकल्पनेवर आधारित आहे. केबिनमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ड्युअल १२.३-इंच + १२.३-इंच वक्र पॅनोरॅमिक डिस्प्ले, जो इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरला एकत्र करतो. नवीन Venue सहा मोनोटोन आणि दोन ड्युअल-टोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. नवीन रंगांमध्ये Hazel Blue आणि Mystic Sapphire समाविष्ट आहेत, तर Atlas White, Titan Grey, Dragon Red आणि Abyss Black देखील पर्याय आहेत. ड्युअल-टोनमध्ये Hazel Blue + Abyss Black आणि Atlas White + Abyss Black रूफसह उपलब्ध आहे. यात इलेक्ट्रिक ४-वे ड्रायव्हर सीट, मागील एसी व्हेंट्स, मागील खिडक्यांसाठी सनशेड्स आणि २-स्टेप रिक्लाइनिंग मागील सीट यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

New Hyundai Venue
Toyota Land Cruiser FJ : टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर' आली; भन्नाट लूक, जबरदस्त फीचर्स; किंमत काय आणि भारतात कधी येणार?

बुकिंग सुरू

नवीन Venue मध्ये HX नावाची नवीन व्हेरियंट नॉमेनक्लेचर आहे, जे Hyundai Experience चे लघुरूप आहे. पेट्रोल रेंजमध्ये HX2, HX4, HX5, HX6, HX6T, HX8 आणि HX10, तर डिझेलमध्ये HX2, HX5, HX7 आणि HX10 उपलब्ध आहेत.

ऑल-न्यू वेन्यूसाठी बुकिंग आता ह्युंदाईच्या डीलरशिप्सवर आणि ऑनलाइन 'क्लिक-टू-बाय' प्लॅटफॉर्मवर सुरू झाले आहे. बुकिंगची टोकन रक्कम २५,००० आहे. कंपनी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी वेन्यूची अधिकृत किंमत जाहीर करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news