Video Viral: थरकाप उडवणारी घटना! मुलाला कारने दिली धडक; चाकाखाली अडकवून फरफटत नेलं, CCTV व्हिडीओ समोर

Kanpur Minor Cyclist Accident: कानपूरच्या कल्याणपूर परिसरात कारने एका अल्पवयीन सायकलस्वाराला धडक दिल्यानंतर काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Kanpur Minor Cyclist Accident Video
Kanpur Minor Cyclist Accident VideoPudhari
Published on
Updated on

Kanpur Minor Cyclist Accident: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणपूर परिसरातील या घटनेचा CCTV व्हिडीओ समोर आला असून, कारने अल्पवयीन मुलाला धडक दिल्यानंतर काही अंतरापर्यंत त्याला फरफटत नेल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कारचालकाचा शोध सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना आवास विकास परिसरातील कैलाश विहारजवळ घडल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक रहिवासी संदीप तिवारी यांच्या मुलासोबत हा प्रकार घडला.

CCTV फुटेजमध्ये मुलगा सायकलवरून रस्त्यावरून जाताना दिसत आहे. त्याचवेळी समोरून एक कार रस्त्यावर वळताना दिसते. कार जवळ येताच मुलगा थांबण्याचा आणि सायकल बाजूला घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, कार पुढे जात राहिल्याने मुलाला धडक बसते.

Kanpur Minor Cyclist Accident Video
Awarapan 2 Review: इम्रान हाश्मीचा 'आवारपन 2' कसा आहे, तो थिएटरमध्ये पाहण्यासारखा आहे की नाही? जाणून घ्या रिव्ह्यू आणि रेटिंग

कारखाली अडकलेल्या मुलाला काही अंतर फरफटत नेलं

धडकेनंतर मुलगा आणि त्याची सायकल कारच्या मागील चाकांखाली अडकल्याचे CCTVमध्ये दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतरही कार पुढे जात राहिल्याने मुलाला काही अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आल्याचा आरोप आहे. काही अंतर गेल्यानंतर चालकाने मुलाला रस्त्याच्या कडेला सोडून तेथून कारसह पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिकांनी मुलाला रुग्णालयात दाखल केलं

घटना लक्षात येताच आसपासच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाला किती गंभीर दुखापत झाली आहे, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Kanpur Minor Cyclist Accident Video
Samay Raina: कॉमेडियन समय रैनाला मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने FIR केला रद्द, ‘इंडियाज गॉट लॅटेंट'मधील 'तो' वाद मिटला?

पोलिसांकडून चालकाचा शोध

घटनेनंतर कारचालकाने वाहन सोडून पळ काढल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार चालक फतेहपूरचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

कल्याणपूर पोलीस CCTV फुटेज तपासत असून, त्याच्या आधारे चालकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच अपघात नेमका कसा झाला आणि मुलाला धडक दिल्यानंतरही कार का थांबली नाही, याचा तपासही पोलीस करत आहेत.

या घटनेचा CCTV व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news