Kangana Ranaut: गटरछाप... दारू पितात आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध...; CJP आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौतची वादग्रस्त टीका

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने मंगळवारी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणींवर जोरदार टीका केली आहे.
Kangana Ranaut CJP protest
Kangana Ranaut CJP protestFile Photo
Published on
Updated on

Kangana Ranaut CJP protest

नवी दिल्ली: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने मंगळवारी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदू तरुणींवर अत्यंत टोकाची आणि वादग्रस्त टीका केली आहे. 'जनरेशन गटर' अशी उपाधी देत, त्यांच्या जीवनशैली, वर्तन आणि आंदोलनाच्या पद्धतीवर कठोर शब्दांत निशाणा साधला. तिच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक भलीमोठी पोस्ट शेअर करत आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदू तरुणींवर टीका केली. काही जणी स्वतःला आधुनिक आणि स्वतंत्र दाखवण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्या स्वातंत्र्याची जबाबदारी स्वीकारत नाहीत, असा दावा केला.

Kangana Ranaut CJP protest
Mohan Bhagwat on Gen Z|'जेन झी' भावुक अन् जुळवून घेणारी; पण शांत विचार करत नाही : भागवत

'ही तर जेनरेशन गटर!'

कंगनाने तरुण पिढीवर जोरदार हल्लाबोल केला. "ही तथाकथित पाश्चात्त्य विचारसरणी असलेल्या भारतीय महिलांची नवी पिढी आहे. मी यांना 'जेनरेशन गटर' म्हणते," असा घणाघात तिने केला. "या महिला अभ्यासात चांगल्या नाहीत. त्या इतक्या कुरूप आणि भ्रष्ट आहेत की एक चांगली गृहिणीसुद्धा बनू शकत नाहीत. असे असूनही, त्या अमली पदार्थ आणि मद्यपान करण्याच्या किंवा अनेक जोडीदारांशी लैंगिक संबंध ठेवण्याच्या आपल्या स्वातंत्र्याचे अभिमानाने प्रदर्शन करतात, असे ती म्हणाली.

कंगना आणखी काय म्हणाली?

नीट पेपरफुटीचा निषेध करण्यासाठी आणि तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी जमलेल्या तरुणींच्या वर्तनावर निशाणा साधताना, कंगना म्हणाली की, या महिला आंदोलकांना स्वतंत्र करिअर असलेल्या महिलांचे जीवन अनुकरण करायचे आहे, पण त्यासाठी आवश्यक असलेले स्वातंत्र्य स्वतः कमावलेले नाही.

"जर तुम्ही जबाबदारीची जाणीव न ठेवता मुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही केवळ एक बिघडलेली व्यक्ती आहात. त्या मुली अमली पदार्थ घेणे, मद्यपान करणे किंवा अनेक जोडीदारांशी लैंगिक संबंध ठेवणे या स्वातंत्र्याचे अभिमानाने प्रदर्शन करतात; हे सर्व करताना त्या निर्लज्जपणे आपल्या पालकांच्या कमाईवर जगतात. प्रत्यक्षात स्वतंत्र नसतानाही मुक्त जीवन जगण्याच्या अधिकारासाठी सतत लढत असतात. मी तुम्हाला एक साधी गोष्ट आठवण करून देते: मुक्त जीवन हे कमवावे लागते. जबाबदारी न स्वीकारता स्वातंत्र्याचा आव आणणारे लोक 'गटर छाप' आहेत," असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Kangana Ranaut CJP protest
SC CJP Protest Order: महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस; सीजेपी आंदोलन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिले ५ महत्वपूर्ण निर्देश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news