Gold chain fraud case: तुम्हीही सोन्यासाठी अ‍ॅडव्हान्स जमा करताय? आधी ही बातमी वाचा; ग्राहक आयोगाचा सराफाला १.३ लाखांचा दणका

सोन्याची साखळी देण्याच्या नावाखाली ग्राहकाकडून १ लाख रुपये अ‍ॅडव्हान्स घेऊनही सोन्याची साखळी आणि पैसेही परत न करणाऱ्या एका सराफाला ग्राहक आयोगाने चांगलाच दणका दिला आहे.
Gold chain fraud case
Gold chain fraud caseFile Photo
Published on: 
Updated on: 

Gold chain fraud case

नवी दिल्ली: सोन्याची साखळी देण्याच्या नावाखाली ग्राहकाकडून १ लाख रुपये अ‍ॅडव्हान्स घेऊनही सोन्याची साखळी आणि पैसेही परत न करणाऱ्या शिमला येथील एका सराफाला ग्राहक आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. हिमाचल प्रदेश राज्य ग्राहक आयोगाने सराफाला १ लाख रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच, नुकसानभरपाई म्हणून २० हजार रुपये आणि कायदेशीर खर्चापोटी १० हजार रुपये देण्याचेही आदेश दिले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

तक्रारदार एम. आर. चौहान यांनी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी शिमला येथील 'श्री गणेश ज्वेलर्स' या दुकानाला भेट दिली होती. त्यावेळी सराफाने त्यांना असे आमिष दाखवले की, जर त्यांनी काही रक्कम अ‍ॅडव्हान्स जमा केली, तर त्यांना भविष्यात सध्याच्याच बाजारभावाने सोने खरेदी करता येईल. या आश्वासनाला बळी पडून चौहान यांनी २.१५ लाख रुपये मूल्याच्या ३५ ग्रॅम सोन्याच्या साखळीसाठी १ लाख रुपयांचा चेक सराफाकडे दिला.

Gold chain fraud case
Pune Mahalaxmi Temple Gold Saree: १६ किलो सोन्याची साडी, दोन किलोच्या मुकुटात महालक्ष्मीचे दर्शन; पुणेकरांची गर्दी

सराफाने ही रक्कम स्वीकारल्याची पावती दिली आणि दोन आठवड्यांत सोन्याची साखळी तयार करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, दोन आठवड्यानी चौहान दुकानात गेले असता, त्यांना सोन्याची साखळी मिळालीच नाही आणि अ‍ॅडव्हान्स दिलेले पैसेही परत करण्यास सराफाने नकार दिला. एवढेच नव्हे तर, असा कोणताही व्यवहार किंवा अ‍ॅडव्हान्स मिळाली नसल्याचे सराफाने सांगितले.

ग्राहक आयोगात धाव

सराफाकडून सातत्याने टाळाटाळ होत असल्याने चौहान यांनी १२ सप्टेंबर २०२३ रोजी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर सेवेतील त्रुटी आणि अनुचित व्यापार पद्धतीचा आरोप करत त्यांनी शिमला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली.

जिल्हा मंचाने सराफाला नोटीस बजावली, परंतु सराफ न्यायालयात हजर राहिला नाही. त्यामुळे ११ सप्टेंबर २०२४ रोजी त्याच्याविरुद्ध एकतर्फी कारवाई करण्यात आली. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा मंचाने चौहान यांच्या बाजूने निकाल देत, सराफाला १ लाख रुपये ९ टक्के वार्षिक व्याजासह परत करण्याचे, मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये आणि न्यायालयीन खर्चासाठी १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

राज्य आयोगानेही कायम ठेवला निर्णय

जिल्हा मंचाने दिलेली भरपाई व व्याजाचा दर कमी असल्याचे सांगत चौहान यांनी अधिक नुकसानभरपाईच्या मागणीसाठी राज्य ग्राहक आयोगात अपील दाखल केले होते. या अपीलावर सुनावणी करताना राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुंदर सिंग मेहता आणि सदस्य योगिता दत्ता यांच्या पीठाने जिल्हा मंचाचा निर्णय अत्यंत योग्य असल्याचे स्पष्ट केले.

"ग्राहकाने १ लाख रुपये अ‍ॅडव्हान्स देऊनही त्याला सोन्याची साखळी किंवा पैसे मिळाले नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र, जिल्हा मंचाने दिलेली भरपाई आणि व्याजाचे आदेश पुरेशी आणि योग्य आहेत. यात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही ठोस कारण नाही," असे निरीक्षण नोंदवत राज्य आयोगाने चौहान यांचे अपील फेटाळले आणि सराफाला एकूण १.३ लाख रुपये ग्राहकाला देण्याचा आदेश दिला.

Gold chain fraud case
Gold Silver Prices Today: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण! 18 कॅरेट सोनं 1 लाखांच्या जवळ; चांदीही स्वस्त, पाहा शहरानुसार भाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news