

शिक्षक अन् मुख्याध्यापिकेच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल
शाळेकडून कुटुंबियांना देखील त्रास
दिल्लीत मोठं आदोलन करण्याचा इशारा
नेमकं काय आहे प्रकरण?
Manoj Jarange Patil In Delhi: महाराष्ट्रातील शौर्य पाटीलने शाळेतील शिक्षकांच्या जाचाला कंटाळून दिल्लीतील मेट्रोच्या खाली उडी मारून आपलं जीवन संपवलं होतं. यानंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शौर्य पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
या दौऱ्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राजकारण्यांना अन् खासदारांना इशारा दिला. त्यांनी जर मराठ्याच्या लेकराला न्याय मिळाला नाही तर मराठे दिल्लीत धडकतील असे वक्तव्य केलं. (Shaura Patil Case)
शौर्य पाटील या मराठी मुलाने दिल्लीत शिक्षक आणि मुख्याध्यापिकेच्या छळाला कंटाळून आपलं जीवन संपवत असल्याची चिठ्ठी लिहिली होती. यानंतर शाळेच्या शिक्षक अन् मुख्याध्यापिका यांच्यावर कडक कारवाईत मागणी होत होती. मात्र त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत नसल्यानं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट दिल्ली गाठली.
दिल्लीतून बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोललो आहे. शौर्या पाटील मृत्यू प्रकरणातील आरोपी अटकेत पाहिजेत नाहीतर आम्ही दिल्लीत आंदोलन करणार.'
जरांगे पाटील पुढे म्हणाले, शाळेकडून मुलांपाठोपाठ आई- वडिलांना देखील त्रास होतोय म्हणजे हा संशोधनचा विषय आहे. आता मी या मॅटरमध्ये पडलो आहे. मराठ्याच्या लेकराला न्याय दिला नाही तर महाराष्ट्रात देखील तुमच्या शाळा आहेत हे लक्षात ठेवा.'
दरम्यान, जरांगे पाटील यांना कोणत्या प्रकारचं आंदोलन करणार असे विचारले असता त्यांनी सगळंच आता उघड करणार नाही असे म्हणत आंदोलनाचं स्वरूप गुलदस्त्यात ठेवलं.
मनोज जरांगे पाटील यांनी ज्या चर्चच्या अधिपत्याखाली ही शाळा येते त्यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले. चर्चचा इथल्या शाळेवर अंकुश नाही का... याबाबत मिशनरीला आदेश द्यायला हवेत.'
मनोज जरांगे पाटील यांनी पाटील कुटुंबीय खूप वेदनेतून जात आहे. मी राज्यातील सर्व खासदारांना मंत्र्यांना अमित शहा साहेबांची भेट घेण्यास सांगितलं आहे. मी यात राजकारण आणणार नाही तुम्हीही आणू नका असंही पाटील यांनी सांगितलं.
जाता जाता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा म्हणू नका आमची दिल्ली तुंबली असं वक्तव्य करून मुंबईतील मराठा आंदोलनाची आठवण करून दिली.
दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या शौर्य पाटील या मराठी विद्यार्थ्याने आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता. पोलिसांकडून आरोप केलेल्या शिक्षकांवर तक्रार दाखल करण्यात आली असली तरी कठोर कारवाई करण्यात आली नाही.
त्यानंतर शौर्यचे वडील प्रदीप पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयात शाळेविरूद्ध याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयानं सुनावणी करत दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली होती. तसेच सुनावणी दरम्यान पोलिसांनी सांगितले की, त्यांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज घेतले आहेत. त्या फुटेजनुसार शाळेवर केलेल्या काही आरोपांची पुष्टी होत आहे.