संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-ताेयबाच्या दहशतवाद्याला अटक
नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन: जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात लष्कर-ए-ताेयबाच्या दहशतवाद्याला पकडण्यात पोलिसांनी यश आले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव फिरदौस अहमद वानी (रा. चेक सेरी पट्टन) असे त्याचे नाव आहे. त्याच्याजवळ एक एके ४७, ५६ मॅगझिन आणि 30 जिवंत काडतुसे (राउंड) जप्त करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील सोपोर पोलिसांनी उपविभाग रफियााबादच्या नदीहाल भागात ३२ आरआर आणि ९२ बीएन सीआरपीएफसह एक संयुक्त सीएएसओ मोहिम सुरू केली होती. या शोध मोहिमेदरम्यान एका दहशतवाद्याला पकडण्यात यश आले.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने प्राथमिक चौकशीदरम्यान लष्कर-ए-ताेयबाचा साथीदार असल्याची माहिती दिली. याच दरम्यान १ एके, ५६ मॅगझिन आणि ३० जिवंत काडतुसे (राउंड) पोलिसांनी जप्त केले.
हेही वाचलंत का?
- Ukraine conflict : युक्रेनमधील पाच शहरांत तात्पुरता युद्धविराम, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मानवतावादी कॉरिडॉर केला खुला
- सरकारच्या नव्या कायद्याने जि.प. सदस्यांचा हिरमोड ; निवडणुका किमान वर्षभर पुढे ढकलण्याची भीती
- Women's Day : आजपासून महिला अंमलदार ८ तास ऑनड्युटी
- मुंबई : प्रभाग रचना रद्द, निवडणुका लांबणीवर

