US Iran tensions | 'भारतीय मीम्स सर्वोत्तम...': इराणच्या दूतावासाने शेअर केला 'होर्मुझ' नाकेबंदीची खिल्ली उडवणारा व्हिडिओ

US Iran tensions |शेअर केलेला व्हिडिओ 'धमाल' चित्रपटातील एक लोकप्रिय सीन
US Iran tensions
मुंबईतील इराणी दूतावासाने 'होर्मुझ' नाकेबंदीची खिल्ली उडवणारा व्हिडिओ पुन्हा शेअर केला आहे.file photo.
Published on
Updated on

US Iran tensions

मुंबई : गेली ४५ दिवस इराण आणि अमेरिकेतील संघर्ष कायम आहे. १५ दिवसांच्‍या युद्‍धविरामाच्‍या घोषणेनंतर उभय देशांमधील शांतता चर्चा फिस्‍कटली आहे. यानंतर अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनी नाकेबंदीचा इशारा दिला आहे. अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी वारंवार बदलेल्‍या भूमिकेवर सोशल मीडियावर लाखो मीम्‍स व्‍हायरल झाले आहेत. आता अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीच्‍या रोखण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांतच मुंबईतील इराणी दूतावासाने या हालचालीची खिल्ली उडवणारा एक व्हिडिओ पुन्हा शेअर केला. तसेच "भारतीय मीम्स GOAT (सर्वोत्तम) आहेत," अशी दादही दिली आहे.

'भारतीय मीम्स सर्वोत्तम

इराण दुवातसाने शेअर केलेल्‍या व्‍हिडिओमध्‍ये 'धमाल' चित्रपटातील एक लोकप्रिय सीन आहे. या माध्‍यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवर लादलेल्या नौदल नाकेबंदीची थट्टा करण्यात आली. अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनी रोखण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांतच, मुंबईतील इराणी दूतावासाने या निर्णयाची खिल्ली उडवणारी एक क्लिप पुन्हा शेअर केली. होर्मुझ सामुद्रधुनी एक महत्त्वाचा जलमार्ग आहे, फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून आधीच विस्कळीत झाला होता.

US Iran tensions
US-Israel Iran War | विजय आमचाच युद्धविरामानंतर दोन्ही देशांचे दावे

अमेरिकेचा खिल्‍ली उडविणारा व्‍हिडिओ केला शेअर

या क्लिपमध्ये अभिनेता रितेश देशमुखची व्यक्तिरेखा त्याचा पाठलाग करणाऱ्यां दरोडेखोरांपासून वाचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या विनोदी सीनमध्ये तो अशा एका दरवाजामागे लपण्याचा प्रयत्न करतो, जिथून बाजूने सहज आत शिरता येते. व्हिडिओमध्ये अभिनेत्याची व्यक्तिरेखा 'अमेरिका' म्हणून दाखवली आहे, तर त्याचा पाठलाग करणारे पुरुष 'इराण' म्हणून दर्शवले आहेत. ही क्लिप शेअर करताना मुंबईतील इराणी दूतावासाने एक्‍स पोस्‍ट केली आहे की, भारतीय मीम्स सर्वोत्तम आहेत.

US Iran tensions
Hormuz Open Iran Reaction: आमच्याकडून हार्मुझची 'किल्ली'च हरवली... शिवराळ डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीची इराणनं हवाच काढली

यापूर्वी केला होता शाहरुख खानच्‍या डॉयलॉगचा वापर

यापूर्वी, मुंबईतील इराणी दूतावासाने अमेरिकेवर निशाणा साधण्यासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या एका प्रसिद्ध डॉयलॉगचा वापर केला होता. दूतावासाने एका एक्‍स पोस्‍टमध्ये म्हटले होते की, “हे किती मजेशीर आहे की ट्रम्प वारंवार असा दावा करत होते की इराणचे नौदल 'संपले' आहे.आता त्यांना कळेल की एक थवा तुम्हाला किती लवकर घेरून टाकू शकतो. 'अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है'.”

US Iran tensions
UAE action on fake War videos | खोडसाळपणा नडला! इराण युद्धाचे बोगस व्‍हिडिओ पोस्‍ट करणार्‍या १९ भारतीयांवर UAEची मोठी कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news