Instagram: इन्स्टाग्राम रील बनवून व्हा श्रीमंत! २० हजार व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात?

Instagram Reel: इंस्टाग्राम व्ह्यूजच्या बदल्यात पैसे देते का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे उत्तर 'हो' असे आहे. जर एखाद्या व्हिडिओला १० किंवा २० हजार व्ह्यूज आले, तर त्याबदल्यात किती पैसे मिळतात?
Instagram Reel
Instagram Reel file photo
Published on
Updated on

Instagram Reel

नवी दिल्ली : सोशल मीडियावरील कमाईबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. विशेषतः Instagram Reels बाबत अनेकांना असे वाटते की, जर एखाद्या व्हिडिओला १० किंवा २० हजार व्ह्यूज आले, तर त्याबदल्यात पैसे मिळतात का? जर हो, तर किती? जर तुम्हीही याच प्रश्नाचे उत्तर शोधत असाल, तर आज तुमच्या या शंकेचे निरसन करूया.

Instagram Reel
Viral News: थरकाप उडवणारी घटना! शाळेत खेळता खेळता वाद झाला अन् मित्रांनी पाचवीच्या विद्यार्थ्याचे डोळे फोडले

यूट्यूबप्रमाणे इंस्टाग्रामही पैसे देते का?

यूट्यूबप्रमाणेच आता इंस्टाग्रामही लोकांना खूप आवडू लागले आहे. अशा परिस्थितीत, इंस्टाग्राम व्ह्यूजच्या बदल्यात पैसे देते का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे उत्तर 'हो' असे आहे, पण हे फीचर सध्या भारतात (थेट व्ह्यूजसाठी) पूर्णपणे सक्रिय नाही. काही देशांमध्ये इंस्टाग्रामचा 'बोनस' किंवा 'Reels Play' प्रोग्राम चालतो.

मात्र, भारतात हा प्रोग्राम अद्याप अधिकृतपणे सक्रिय झालेला नाही. भारतातील बहुतांश इंस्टाग्राम क्रिएटर्स ब्रँड डील्सच्या माध्यमातून कमाई करतात. जर तुमचे व्हिडिओ व्हायरल होत असतील आणि तुमच्याकडे चांगली प्रेक्षकसंख्या असेल, तर ब्रँड स्वतः तुमच्याशी संपर्क साधून त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करतात. या जाहिरातीच्या बदल्यात ते तुम्हाला पैसे देतात. सध्या भारतात इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्याचा हाच मुख्य मार्ग आहे.

किती होते कमाई?

जर तुम्ही छोटे क्रिएटर असाल आणि तुमच्या पोस्टवर सरासरी १० ते २० हजार व्ह्यूज येत असतील, तर तुम्हाला प्रत्येक रीलमागे ५०० ते २००० रुपयांपर्यंत मिळू शकतात. मात्र, ही रक्कम ब्रँडनुसार कमी किंवा जास्त होऊ शकते. जर तुमचे फॉलोअर्स मिलियन्समध्ये असतील, तर तुम्ही हजारांपासून लाखांपर्यंत कमाई करू शकता.

याशिवाय, काही क्रिएटर्स इंस्टाग्रामवर Affiliate Marketing करूनही पैसे कमावतात. यामध्ये ते आपल्या स्टोरी, बायो किंवा पोस्टमध्ये उत्पादनाची लिंक देतात. जर कोणी त्या लिंकवर क्लिक करून वस्तू खरेदी केली, तर क्रिएटर्सना त्यावर कमिशन मिळते.

Instagram Reel
Viral News: लग्नाच्या पहिल्या रात्री वधूची अशी मागणी.., सुहागरात सोडून नवरदेव पळून गेला; नेमकं काय घडलं?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news