Delhi Blast Umar Nabi
Delhi Blast Umar NabiPudhari

Delhi Blast Umar Nabi: उमरला पकडायला पोलीस जाणारचं होते पण...; अटकेच्या भीतीने घाबरलेल्या आरोपीने ब्लास्ट घडवला?

Red Fort Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा मुख्य आरोपी डॉ. उमर नबी पोलिसांच्या हातून थोडक्यात सुटला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याचा साथीदार डॉ. मुजम्मिल शकीलला अटक केल्यानंतर उमर फरार झाला.
Published on

Delhi Red Fort Blast Umar Nabi Jaish Module Investigation:

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाच्या तपासात आता नवीन माहिती समोर आली आहे. या स्फोटाचा मुख्य संशयित आरोपी डॉ. उमर नबी हा फरीदाबादमधील अल-फलाह मेडिकल कॉलेजमधून सुमारे आठवडाभर आधीच फरार झाला होता, असे उघड झाले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याच्या जवळच्या मित्राला डॉ. मुझम्मिल शकील (पुलवामा) याला अटक केल्यानंतर उमर संशयाच्या जाळ्यात आला आणि तो पोलिसांच्या छाप्यापूर्वीच फरार झाला, अशी माहिती मिळाली आहे.

डॉ. उमरवर संशय का आला?

सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनुसार, डॉ. मुझम्मिलच्या घरावर छापा टाकल्यावर आणि त्याच्या अटकेनंतर उमर हादरला. त्याला वाटले की आता आपण पण अडकणार, म्हणून त्याने फरीदाबादमधील नोकरी सोडली आणि फरार झाला. पोलिसांनी सांगितले की, मुझम्मिलची अटक 30 ऑक्टोबर रोजी फरीदाबादमध्ये झाली, आणि चौकशीच्या तिसऱ्या दिवशीच त्याने उमर व आणखी एका डॉक्टरचे नाव उघड केले. परंतु तोपर्यंत उमर गायब झाला होता.

‘जैश-ए-मोहम्मद’शी संबंध; चार डॉक्टरांवर संशय

या संपूर्ण कारवाईत उघड झालेल्या मॉड्युलचा पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेशी थेट संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. या नेटवर्कमध्ये सुमारे 12 जण सामील होते, त्यात चार डॉक्टरांचा सहभाग असल्याचा संशय आहे. हा तपास 19 ऑक्टोबर रोजी श्रीनगरच्या बाहेर लावलेल्या जैश समर्थक पोस्टर्सपासून सुरू झाला, ज्यात बदला घेण्याची धमकी देण्यात आली होती.

Delhi Blast Umar Nabi
Delhi Red Fort Blast : ‌‘जिहाद‌’चे विष मेंदूत खोलवर भिनले, दोन्ही डॉक्टर दहशतवादाकडे वळले

‘मौलवी इरफान’ने केलं ब्रेनवॉशिंग

तपासात असं समोर आलं की, शोपियानचा मौलवी इरफान वागे हा या संपूर्ण मॉड्युलचा सूत्रधार होता. तो श्रीनगरच्या मशिदीत प्रचारक म्हणून काम करत होता आणि डॉक्टरांसह काही तरुणांचे ब्रेनवॉशिंग करण्याचे काम करत होता. इरफानला अटक झाल्यावर त्याने गांदरबलमधील जमीअर अहमद अहेंगरचे नाव उघड केले, ज्याने पुढे डॉक्टरांच्या सहभागाबाबत माहिती दिली.

डॉ. मुझम्मिलच्या चौकशीत धक्कादायक माहिती

मुझम्मिलच्या चौकशीत पोलिसांना फरीदाबादमधील अल-फलाह कॉलेजमधील प्राध्यापक शाहीन सईदचे नाव कळाले. तिच्या कारमधून अत्याधुनिक असॉल्ट रायफल जप्त करण्यात आली, आणि नंतर तिला अटक करण्यात आली. शाहीनने मुझम्मिलला आर्थिक मदत केल्याचे आणि रायफल काही दिवस कारमध्ये ठेवल्याचीही माहिती दिली.

Delhi Blast Umar Nabi
Watch: दिल्ली स्फोटाचा नवीन व्हिडिओ समोर; चालत्या गाड्यांच्या मध्येच उडाली कार! CCTV फुटेज पाहून बसेल धक्का

2,500 किलो स्फोटकं आणि ‘अमोनियम नायट्रेट’चा साठा

मुझम्मिल आणि आदिल या डॉक्टरांच्या कबुलीजबाबावरून पोलिसांनी फरीदाबादच्या फतेपूर टागा गावात 2,500 किलो IED बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. यातील सुमारे 360 किलो अमोनियम नायट्रेटचा साठा आधीच जप्त झाला होता, आणि हेच पदार्थ लाल किल्ल्याच्या स्फोटात वापरले गेले असावेत, असा संशय आहे.

छापे सुरू असतानाच 10 नोव्हेंबर रोजी उमर नबी ‘हुंडई i20’ कारमधून बादरपूर बॉर्डर ओलांडताना दिसला. याच कारचा नंतर लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला, ज्यात 12 लोक ठार आणि सुमारे 24 जण जखमी झाले. गृह मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) वर्ग केली असून, फरीदाबाद, दिल्ली, श्रीनगर आणि पुलवामा येथे तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news