

President Vladimir Putin Visiting India
नवी दिल्ली : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार वर्षांनंतर भारताच्या दौऱ्यावर येत असल्याने दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 4 आणि 5 डिसेंबरला होणाऱ्या या दोन दिवसीय भेटीसाठी राजधानीला अक्षरशः किल्ल्याचे रूप आले आहे. पुतिन यांच्यासोबत येणाऱ्या 130 सदस्यीय प्रतिनिधी मंडळामुळे सुरक्षा यंत्रणा पूर्ण सतर्क मोडवर आहेत.
पुतिन हे भारत-रशिया 23वे वार्षिक शिखर संमेलन अटेंड करण्यासाठी येत आहेत. ते 4 डिसेंबरला दिल्लीमध्ये पोहोचतील. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खासगी डिनर आणि द्विपक्षीय चर्चा होईल. 5 डिसेंबरला बिझनेस मिटिंग्स आणि राजकीय डिनर (स्टेट बँक्वेट) आयोजित करण्यात आला आहे.
या बैठकीत संरक्षण, ऊर्जा, अंतराळ संशोधन आणि व्यापार या प्रमुख विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. रशिया S-400 च्या नवीन डील, Su-57 फायटर जेट्स आणि तेल निर्यात वाढवण्याबाबत प्रस्ताव मांडू शकतो.
दिल्लीला ‘नो-रिस्क झोन’ घोषित करून मल्टीलेअर सुरक्षा रिंग तयार करण्यात आली आहे.
रशियाची 50 हून अधिक सदस्यांची अॅडव्हान्स सिक्युरिटी टीम आधीच दिल्लीमध्ये दाखल झाली आहे. त्यांनी पुतिन यांच्या मार्गांचा, कार्यक्रम स्थळांचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा तपशीलवार आढावा घेतला आहे.
दिल्ली पोलिस
केंद्रीय सुरक्षा संस्था
पॅरामिलिटरी फोर्स
एनएसजी कमांडो
एसडब्ल्यूएटी टीम
अँटी-टेरर स्क्वॉड
क्विक रिअॅक्शन फोर्स
या सर्वांना शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.
पुतिन यांच्या वैयक्तिक सुरक्षा पथकात 50+ प्रशिक्षित कमांडो आहेत. त्यांचे अन्न आणि सुरक्षा साहित्य रशियातूनच येणार आहे. त्यांच्या हॉटेल आणि वाहनांसाठी पोर्टेबल सुरक्षा प्रणाली उभारण्यात आली आहे.
पुतिन यांच्या ताफ्याच्या मार्गावर ट्रॅफिक डायव्हर्जन लागू केले जाईल. दिल्ली पोलिसांचे पथक या सर्व हालचालींवर नजर ठेवत आहे. स्वच्छता, तपासणी आणि ‘एरिया सॅनिटायझेशन’ आधीच पूर्ण झाले आहे. पुतिन कुठे थांबणार हे सुरक्षा कारणास्तव गुप्त ठेवण्यात आले आहे.
पुतिन यांच्या भेटीसाठी फक्त पोलिस नाही, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानही वापरण्यात येणार आहे
अँटी-ड्रोन गन्स: वरून येणाऱ्या कोणत्याही हवाई धोक्यासाठी.
मूव्हिंग ड्रोन सर्व्हेलन्स: सतत आकाशातून नजर.
सीसीटीवी + फेस रिकग्निशन: रिअल-टाइम ट्रॅकिंग.
सिग्नल मॉनिटरिंग: कोणतेही संशयास्पद कम्युनिकेशन पकडण्यासाठी.
दिल्ली पोलिसांची कंट्रोल रूम 24x7 सक्रिय असून सर्व एजन्सीज रिअल-टाइम कोऑर्डिनेशनमध्ये आहेत.
नुकत्याच दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर सुरक्षेची संवेदनशीलता अधिकच वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर पुतिन यांच्या भेटीसाठी विशेष प्रोटोकॉल लागू करण्यात आले आहेत. गुप्तचर संस्थाही संभाव्य धोक्यांवर सतत नजर ठेवून आहेत.
विशेषज्ञांचे मत आहे की पुतिन यांची सुरक्षा जगातील सर्वात मजबूत मानली जाते आणि त्यामुळे भारत-रशियाच्या संयुक्त सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहणार नाही.
या दौऱ्यात दोन्ही देश संरक्षण सहकार्य वाढवणार आहेत. ऊर्जा, तेल, अंतराळ आणि व्यापारातील नव्या संधींचे मार्ग खुले होणार आहे. हा दौरा भारत-रशिया संबंधांना आणखी मजबूत करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुतिन यांच्या भेटीनंतर कोणते मोठे निर्णय होतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.