

Vladimir Putin Warn Europe:
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी युरोपातील देशांच्या नेत्यांना इशारा देत तुम्हाला जर युद्ध हवं असेल तर रशिया तुम्हाला पराभूत करेल असं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, 'जर तुम्हाला युद्ध हवं असेल तर रशिया तुम्हाला पराभूत करेल. युरोपियन शक्तींचा पराभव इतका निश्चित आहे. हा पराभव असा असेल की कोणी शांती प्रस्तावासाठी देखील वाचणार नाही.'
पुतीन यांनी हे वक्तव्य भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी केलं आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन ४ डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी मॉस्कोमध्ये युक्रेवर मोठा हल्ला करण्याच्या रणनैतिक हालचालींना वेग आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे जावयी जेरेड कोरी कुशनर हे युक्रेनमधील युद्धावर बोलणी करण्यासाठी मॉस्कोत आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्या हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.
पुतीन हे मॉस्कोमध्ये गुंतवणूक समुदायाला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी युरोपला युद्धाची धमकी दिली. दुसरीकडं विटकॉफ आणि कुशनर हे रशिया - युक्रेन शांती प्रस्तावावर बोलणी करण्यासाठी मॉस्कोतच पुतीन यांची वाट पाहत होते.
गुंतवणूक समुदायाला संबोधित करत असताना पुतीन म्हणाले, 'युद्ध हे काही चांगलं नाही मात्र जर युरोप अचानक आमच्यासोबत युद्ध करू इच्छितो आणि त्यांनी युद्ध सुरू केलं तर आम्ही देखील तयार आहोत. युरोपचे युद्धाच्या दिशेने कोणतेही पाऊल उचलले तर अशी परिस्थिती निर्माण होईल की चर्चा करण्यासाठी कोणी वाचणारच नाही.'
पुतीन यांनी पत्रकारांना सांगितलं की त्यांच्याजवळ शांतीसाठी कोणतं धोरण नाही. ते युद्धाच्या बाजूचे आहेत. पुतीन यांनी युरोपने शांती प्रस्तावात बदल केल्याचा आरोप केला. या प्रस्तावात अशा मागण्या आहेत ज्या रशियाला अजीबात मान्य नाहीत. असं करून शांती प्रक्रियेला पूर्णपणे थांबवण्यात आलं आहे. मात्र यासाठी फक्त रशियालाच जबाबदार धरलं जात आहे.
पुतीन पुढे म्हणाले, त्यांचा हाच उद्येश आहे. पुतीन यांनी रशियाचा युरोपवर हल्ला करण्याची कोणती योजना नाहीये. मात्र काही युरोपीय देश कायम याबाबत चिंता व्यक्त करतात. मात्र जर युरोप जर आमच्याशी युद्ध करू इच्छितो आणि सुरू करतो. त्यासाठी आम्ही तयार आहोत. यात कोणतीच शंका नाही.
पुतीन यांनी जोपर्यंत जेलेन्स्की सत्तेत आहेत तोपर्यंत कोणताही शांती करार करणं हे व्यर्थ आहे. पुतीन यांनी युक्रेनी सैन्यानं त्यांच्या ताब्यातील भूभाग सोडला तर आम्ही लढाईचा पर्याय सोडून देऊ. मात्र तसं केलं नाही तर आम्ही ते सैन्य मार्गानं मिळवू.
पुतीन यांनी मॉस्कोत अमेरिकेचे शिष्टमंडळाची देखील भेट घेतली. माध्यमांना या बैठकीवेळी दूर ठेवण्यात आलं. ही बैठक ५ तास सुरू होती. पुतीन यांनी एक्सवर ही बोलणी प्रोडक्टिव्ह होती अशी प्रतिक्रिया दिली.