IndiGo Fight Emergency Landing : 'बॉम्ब' शब्द लिहिलेला टिशू पेपर सापडला, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सुरक्षा यंत्रणांची धावपळ

लखनऊ येथून सौदी अरेबियातील दम्मम येथे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे अहमदाबाद इमर्जन्सी लँडिंग
IndiGo flight
File Photo
Published on
Updated on

Indigo Flight Emergency Landing Ahmedabad : लखनऊ येथून सौदी अरेबियातील दम्मम येथे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने गुरुवारी अहमदाबाद विमानतळावर तातडीने आणीबाणीच्या परिस्थितीत लँडिंग (इमर्जन्सी लँडिंग) करण्यात आले. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत. धमकी मिळाल्यानंतर विमान सुरक्षितपणे आयसोलेशन बे (स्वतंत्र परिसर) मध्ये हलवण्यात आले, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

"बॉम्ब" असा शब्द लिहिलेला एक टिशू पेपर सापडला

प्राथमिक माहितीनुसार, विमानात "बॉम्ब" असा शब्द लिहिलेला एक टिशू पेपर सापडला, त्यानंतर विमानाचा मार्ग बदलण्यात आला. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ सुरक्षा प्रोटोकॉल सक्रिय करण्यात आले. सुरक्षा प्रक्रियेचा भाग म्हणून अधिकारी विमानाची आवश्यक तपासणी करत आहेत.

IndiGo flight
Rohit Pawar vs Parinay Phuke : काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवरून आरोप-प्रत्यारोप, भाजप आमदार फुकेंना रोहित पवारांचे प्रत्युत्तर

सुरक्षा यंत्रणा सतर्क

अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊ ते दम्मम दरम्यान उड्डाण करणाऱ्या इंडिगोच्या '6E 97' या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर अहमदाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, एका कर्मचाऱ्याला “बॉम्ब” असा शब्द लिहिलेला कागदाचा तुकडा सापडला, त्यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले.

IndiGo flight
Supreme Court :'विवाहांमुळे व्यक्तीचे वैयक्तिक स्वांतत्र्य हिरावले जात नाही';वैवाहिक बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही

या विमानात १०७ प्रवासी आणि ६ कर्मचारी प्रवास करत होते. हे सर्वजण सुरक्षित असून त्यांना विमानतळाच्या टर्मिनल २ वर नेण्यात आले. स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG), स्थानिक पोलीस आणि CISF च्या जवानांनी विमानाची तपासणी केली. मात्र, विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

IndiGo flight
High Court : "हीच का तुमची कार्यक्षमता?" : रुग्णालय कर्मचारी मारहाण प्रकरणी हायकोर्टाकडून पालघर पोलिसांची खरडपट्टी

श्रीनगर विमानतळावर इंडिगोचे विमान खांबाला धडकले

काही दिवसांपूर्वी घडलेल्या इंडिगोच्या दुसऱ्या एका घटनेत, नवी मुंबईहून आलेले विमान श्रीनगर विमानतळावर पार्क करत असताना एका खांबाला धडकले. या दुर्घटनेत विमानाचे नुकसान झाले, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा प्रवासी व कर्मचारी जखमी झाले नाहीत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोचे '6E 225' (VT-NOG) हे विमान सकाळी ९:०२ च्या सुमारास बे नंबर ६ वर उभे केले जात असताना पार्किंगच्या प्रक्रियेदरम्यान व्हिज्युअल डॉकिंग गायडन्स सिस्टमच्या (VDGS) खांबाला धडकले. विमानावरील सर्वप्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून त्यांना मॅन्युअल शिडीच्या साहाय्याने खाली उतरवण्यात आल्याचे प्राधिकरणाने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news