Indian astronaut space farming | शुभांशु शुक्ला यांनी अंतराळ स्थानकात पिकवली मेथी आणि मूग; ही रोपे भारतात आणणार...

Shubhanshu Shukla space farming | धारवाड कृषी विद्यापीठातील संशोधकांच्या संकल्पनांना शुभांशू शुक्लांची साथ, मायक्रोग्रॅव्हिटीत स्टेम सेल्सवरही महत्वाचे संशोधन
Shubhanshu Shukla space farming AI generated image
Shubhanshu Shukla space farming AI generated imagePudhari
Published on
Updated on

Indian astronaut Shubhanshu Shukla space farming Methi and moong crop cultivation

नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) असून, त्यांच्या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी एक वेगळ्याच भूमिकेत महत्वाची कामगिरी बजावली आहे. अंतराळ शेतकरी म्हणून त्यांनी कामगिरी पार पाडली आहे.

शुभांशु यांनी मेथी आणि मूग या बियांना अंकुर फुटतानाचे फोटो घेतले असून, या बिया सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात (microgravity) कशा प्रकारे उगम पावतात याच्या अभ्यासासाठी त्या स्टोरेजसाठी फ्रीझरमध्ये ठेवल्या आहेत.

धारवाड कृषी विद्यापीठातील वैज्ञानिकांचा प्रयोग

ही अभ्यासमोहीम भारतातील दोन प्रमुख संशोधन संस्थांमधील सहकार्याचा भाग आहे. कर्नाटकातील कृषी विद्यापीठ (University of Agricultural Sciences, Dharwad) येथील प्रा. रविकुमार होसामानी आणि IIT धारवाड येथील डॉ. सुधीर सिद्धापूरेड्डी हे या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत.

या प्रयोगाद्वारे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये बियांची उगम प्रक्रिया, सुरुवातीची वाढ, आनुवंशिक बदल, सूक्ष्मजैविक संवाद आणि पौष्टिक मूल्य यावर काय परिणाम होतो याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.

Shubhanshu Shukla space farming AI generated image
Indian nurse Nimisha priya | भारतीय नर्सला येमेनमध्ये 16 जुलैला फाशी देणार; आईकडून अखेरची धडपड, 8 कोटी रूपये देण्याची तयारी...

ते अंकुर पृथ्वीवर आणणार

या प्रयोगात अंकुरलेल्या बिया पृथ्वीवर परत आणल्या जातील आणि त्यांच्यावर पुढील अनेक पिढ्यांपर्यंत अभ्यास केला जाईल. अंतराळातील स्थितींमुळे त्या बियांमध्ये झालेले बदल, त्यांचे आनुवंशिक परिणाम आणि भविष्यातील शेतीसाठी त्यांची उपयुक्तता याचा अभ्यास केला जाणार आहे, असे अ‍ॅक्सिओम स्पेसने PTI या वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात सांगितले.

सूक्ष्म शैवालावही (Microalgae) संशोधन

बियांच्या प्रयोगांशिवाय शुक्ला सूक्ष्म शैवाळांवरही काम करत आहेत. अन्न, प्राणवायू आणि जैवइंधन निर्माण करण्यासाठी सूक्ष्म शैवाळांचा वापर होऊ शकतो. अंतराळातील दीर्घकालीन मोहिमांसाठी मानव जीवन टिकवण्यासाठी हे सूक्ष्मजीव महत्त्वाचे ठरू शकतात.

शुक्ला एका अन्य प्रयोगात सहा प्रकारच्या पिकांच्या बियांवरही काम करत आहेत, ज्या अनेक पिढ्यांपर्यंत वाढवल्या जाणार आहेत.

Shubhanshu Shukla space farming AI generated image
Justice Varma impeachment | न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोगाची तयारी; संसदेच्या पावसाळी अधिवेशनात येणार प्रस्ताव

काय म्हणाले शुभांशु शुक्ला

“माझ्याकडून स्टेम सेल संशोधन, बीयांवरील प्रभाव, अंतराळात स्क्रीनशी संवाद साधताना होणारा मेंदूवरचा ताण यांचा अभ्यास केला जात आहे. हे सगळं अत्यंत रोचक आहे. संशोधक आणि अंतराळ स्थानक यामधील एक दुवा झाल्याचा मला खूप अभिमान आहे,” असे शुक्ला यांनी अ‍ॅक्सिओम स्पेसच्या मुख्य शास्त्रज्ञ लुसी लो यांच्याशी संवाद साधताना सांगितले.

शुक्ला म्हणाले, “इस्रोने देशभरातील विविध संशोधन संस्थांबरोबर सहकार्य करून अतिशय उत्तम प्रयोग तयार केले आहेत आणि ते मी येथे अंतराळ स्थानकावर करत आहे, हे माझ्यासाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाचे काम आहे.”

स्टेम सेल संशोधनाचाही भाग

शुक्ला म्हणाले, “माझ्यासाठी एक अत्यंत रोमांचक प्रकल्प म्हणजे स्टेम सेल संशोधन. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात स्टेम सेलमध्ये पूरक घटक जोडून जखम भरून काढणे, वाढ किंवा पुनरुत्पादन जलद करता येईल का, याचा शोध घेणारे संशोधन मी ‘ग्लोव्ह बॉक्स’ मध्ये करत आहे. हे काम करताना खूपच उत्साह वाटतो आहे.”

Shubhanshu Shukla space farming AI generated image
Shubhanshu Shukla | अंतराळ स्थानकात 'हे' काम सर्वात अवघड... अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा ISRO च्या प्रमुखांशी संवाद

अ‍ॅक्सिओम-4 मोहिम अंतिम टप्प्यात

शुभांशु शुक्ला हे अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेचा भाग आहेत, ज्याद्वारे त्यांना 12 दिवसांपासून ISS वर काम करण्याची संधी मिळाली आहे. 10 जुलैनंतर फ्लोरिडा किनारपट्टीवरील हवामानानुसार त्यांचे पृथ्वीवर आगमन होणार आहे. NASA ने अद्याप अचूक परतीची तारीख जाहीर केलेली नाही, मात्र मोहिम 14 दिवसांपर्यंत वाढू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news