

Indian aquanauts
नवी दिल्ली : भारताच्या सागरी संशोधनाच्या इतिहासात एक मोठी कामगिरी घडली आहे. भारतीय एक्वानॉट्सनी प्रथमच समुद्राच्या 5000 मीटर खोलवर जाऊन एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ही मोहीम भारताच्या स्वदेशी समुद्रयान प्रकल्प ‘मत्स्य 6000’ च्या तयारीचा एक महत्त्वाचा टप्पा होता.
5 आणि 6 ऑगस्ट रोजी भारतीय एक्वानॉट्सनी फ्रेंच सबमर्सिबल ‘नॉटाईल’ च्या सहाय्याने उत्तर अटलांटिक महासागरात ही डीप डाइव्ह मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
5 ऑगस्ट: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजीचे शास्त्रज्ञ राजू रमेश यांनी पोर्तुगालच्या किनाऱ्याजवळ 4,025 मीटर खोलवर यशस्वी गोता घेतला.
6 ऑगस्ट: भारतीय नौदलाचे निवृत्त कमांडर जतिंदर पाल सिंग यांनी 5,002 मीटर खोलवर जाऊन विक्रम केला.
भारत सरकारच्या डीप ओशन मिशन अंतर्गत विकसित होणारे ‘मत्स्य 6000’ हे मानवसहित समुद्रयान 2027 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. हे सबमर्सिबल 6000 मीटर खोलवर जाऊ शकते.
भारत हा जगातील सहावा देश ठरेल ज्याने मानवी सबमर्सिबल विकसित केले आहे. याआधी अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन यांनी अशी याने विकसित केली आहेत.
टायटॅनियम अॅलॉय पासून बनलेले आहे (जाडी: 80mm)
3 व्यक्तींना क्षमतेसह, 96 तासांचा ऑक्सिजन स्टॉक
2.1 मीटर व्यास
600 वेळा अधिक दबाव सहन करण्याची क्षमता (समुद्रतळावरचा दाब)
पाणबुडी (Submarine):
पाण्याच्या वर आणि खाली चालणारी
विद्युत/डीझेल इंजिनद्वारे चालते
लष्करी, टोही आणि दीर्घकालीन मिशन्ससाठी वापर
सबमर्सिबल (Submersible):
फक्त पाण्याखाली कार्यक्षम
लहान आकार, संशोधनासाठी वापर
जहाजाच्या सहाय्याने पाण्यात सोडले जाते
स्वतंत्रपणे ऑपरेट करत नाही
जगभरात ई-वाहने आणि बॅटरींसाठी लागणाऱ्या धातूंची मागणी वाढत आहे. जमिनीवरील स्रोत मर्यादित असल्याने, समुद्राच्या खोल तळावर उपलब्ध धातूंवर भर दिला जात आहे.
खोल समुद्रात आढळणारे प्रमुख धातू:
लिथियम, तांबे, निकेल – बॅटरीसाठी
कोबाल्ट – इलेक्ट्रिक कार्ससाठी
मॅग्नीज – स्टील उद्योगासाठी
IEA (International Energy Agency) चा अंदाज:
2030 पर्यंत लिथियमची मागणी 5 पट
कोबाल्टची मागणी 4 पट होणार आहे
या ऐतिहासिक मोहिमेनंतर केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दोन्ही भारतीय एक्वानॉट्सची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. भारताच्या डीप ओशन मिशनने आता एक नवा टप्पा गाठला आहे.
दरम्यान, ‘मत्स्य 6000’ सबमर्सिबलमुळे भारत सागरी संशोधन, खनिज उत्खनन आणि समुद्रतळावरील अभ्यासात आघाडीवर येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.