Matt Deitke Meta deal | 'मेटा'ची 1040 कोटींची ऑफर नाकारणाऱ्या तरुणाला झुकेरबर्गनेच घातलं साकडं; अन् दिली 2080 कोटींची ऑफर

Matt Deitke Meta deal | मेटाच्या 'सुपरइंटेलिजन्स' टीमचा ताजातवाना चेहरा! गूगल, Apple, ओपनएआयला मागे टाकत मेटाने घेतला महत्त्वाचा खेळाडू
Matt Deitke - Mark Zuckerberg
Matt Deitke - Mark Zuckerberg Pudhari
Published on
Updated on

Matt Deitke Meta deal

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेटा (Meta) कंपनीकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात आघाडी घेण्याच्या प्रयत्नांमध्ये मोठी भर पडली आहे. 24 वर्षीय AI संशोधक मॅट डिटके (Matt Deitke) याला मेटा कंपनीने सुरुवातीला $125 दशलक्ष (अंदाजे 1040 कोटी रुपये) चे आकर्षक पॅकेज दिले होते.

मात्र, हे पॅकेज त्याने नाकारले. त्यानंतर मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः त्याची भेट घेतली आणि वैयक्तिक संवादानंतर हे पॅकेज दुप्पट करून $250 दशलक्ष (सुमारे 2080 कोटी) करण्यात आले.

कोण आहे मॅट डिटके?

मॅट डिटके हा AI क्षेत्रातील एक प्रतिभावान संशोधक मानला जातो.

त्याने Molmo नावाच्या मल्टीमोडल AI चॅटबॉटचे नेतृत्व केले होते. हा चॅटबॉट प्रतिमा, ध्वनी आणि मजकूर एकत्रितपणे प्रक्रिया करू शकतो.

2022 मध्ये NeurIPS परिषदेत त्याच्या संशोधनाला "Outstanding Paper Award" मिळाला होता, जो 10000 पेक्षा अधिक सादरीकरणांमधून केवळ 12 जणांनाच दिला गेला.

त्याने Vercept नावाची स्वतःची AI स्टार्टअप कंपनी स्थापन केली आहे, ज्यामध्ये AI एजंट्स इंटरनेटवरील विविध सॉफ्टवेअर वापरून स्वयंचलित कामे करू शकतात.

या स्टार्टअपने गुंतवणूकदारांकडून 16.5 दशलक्ष डॉलर उभारले आहेत. यामध्ये Google चे माजी CEO एरिक श्मिट यांचाही समावेश आहे.

Matt Deitke - Mark Zuckerberg
Cluely dating bonus | प्रेम जुळवा, बोनस मिळवा! ऑफिसमधील सहकाऱ्याला डेटवर पाठवल्यास रु. 42000 रोख मिळणार, Refer-a-Date स्कीम चर्चेत

मेटा का झाला इतका उत्सुक?

मेटा कंपनी सध्या "सुपरइंटेलिजन्स" संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. त्यांनी OpenAI, Anthropic, Apple, Google यांसारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांमधून टॉप AI टॅलेंट्सला आकर्षित केलं आहे.

यामध्ये अलीकडेच मेटाने Apple च्या AI मॉडेल्स टीमचे प्रमुख Ruoming Pang यांनाही 200 दशलक्ष डॉलरचे पॅकेज देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे.

मॅट डिटकेने करार का स्वीकारला?

सुरुवातीला डिटकेने आपले स्वतःचे स्टार्टअप चालू ठेवण्याच्या इच्छेमुळे मेटाचा 125 दशलक्ष डॉलरचा प्रस्ताव नाकारला होता.

मात्र मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्याची भेट घेतली.

या भेटीनंतर मेटा कंपनीने पॅकेज 250 दशलक्षपर्यंत डॉलरपर्यंत वाढवलं, ज्यामध्ये पहिल्याच वर्षी 100 दशलक्ष डॉलर मिळण्याची शक्यता आहे.

अशा अविश्वसनीय पॅकेजनंतर डिटकेने आपल्या सहकाऱ्यांचा सल्ला घेऊन शेवटी प्रस्ताव स्वीकारला.

Matt Deitke - Mark Zuckerberg
US vs Russia Submarine | महासागरांवर वर्चस्व कुणाचे अमेरिका की रशिया? कुणाकडे आहेत सर्वाधिक शक्तिशाली सबमरीन्स?

मेटा कंपनीचे हे भरभक्कम भरती धोरण हे दर्शवते की AI क्षेत्रातली स्पर्धा केवळ तंत्रज्ञानापुरती मर्यादित नाही, तर ही प्रतिभेचीदेखील शर्यत आहे. मॅट डिटकेसारख्या युवकाला इतक्या मोठ्या पगाराची ऑफर देऊन कंपनीने त्याच्या कौशल्याची आणि संभाव्य योगदानाची जाणीव अधोरेखित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news