Robot Mall | अल्बर्ट आईनस्टाईन यांच्यासारखा रोबोट; 'या' देशात सुरू झाला जगातला पहिला रोबो मॉल; किंमत **,500 रुपयांपासून पुढे

Robot Mall | मानवासारखे बोलणारे, चालणारे 100 प्रकारचे रोबोट्स विक्रीसाठी सज्ज; 200 हून अधिक ब्रँड्स
albert einstein robot - Robot mall at beijing
albert einstein robot - Robot mall at beijingPudhari
Published on
Updated on

Robot Mall Beijing Humanoid Robots for Sale Life-like Robots Albert Einstein Robot China Robot Store

बीजिंग : जगभरातील तंत्रज्ञानप्रेमींसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलत, चीनची राजधानी बीजिंगमध्ये ‘रोबोट मॉल’ या नावाने एक आगळंवेगळं स्टोअर नुकतंच सुरु झालं आहे.

या मॉलमध्ये युजर्सना आता थेट मानवी रूपासारखे दिसणारे रोबोट्स, यांत्रिक बटलर (नोकर), बुद्धीबळ खेळणारे यंत्रमानव आणि अगदी हुबेहूब प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन सारखे असे 100 हून अधिक प्रकारचे रोबोट्स विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

ह्युमनॉईड्स थेट बाजारात

या मॉलमध्ये विक्रीस ठेवले गेलेले ह्युमनॉईड्स म्हणजे मानवी स्वरूपातील रोबोट्स असून ते सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील काही रोबोट्स इतके हुबेहूब आहेत की ते पाहताना त्यांना रोबोट समजणे कठीण जाते.

उदाहरणार्थ, अल्बर्ट आईन्स्टाईनच्या चेहऱ्याचा, हावभावाचा आणि आवाजाचेही हू-ब-हू अनुकरण करणारा रोबोट येथे पाहायला मिळतो.

albert einstein robot - Robot mall at beijing
Baby bonus China |जन्मदर वाढविण्यासाठी चीन देणार बोनस; नवजात बालकांसाठी दाम्पत्याला मिळणार रोख 10,800 युआन

किंमती – सामान्यांपासून लक्झरी ग्राहकांसाठी

या मॉलमधील रोबोट्सची किंमत 2000 युआन (सुमारे 23,500 रुपये) पासून सुरू होते आणि काही रोबोट्सची किंमत काही कोटी रुपयांपर्यंत आहे. यामुळे सामान्य ग्राहकांपासून ते उच्चभ्रू वर्गापर्यंत प्रत्येकासाठी काही ना काही उपलब्ध आहे.

सेवा केंद्र आणि सुटे भाग

‘रोबोट मॉल’मध्ये फक्त विक्रीच नाही तर देखभाल सेवा, सुटे भाग आणि तांत्रिक सहाय्यदेखील मिळते. हे मॉल एकप्रकारे कार डीलरशिपप्रमाणे कार्य करते, जिथे ग्राहकांना विक्रीनंतरही संपूर्ण सेवा पुरवली जाते.

रोबोटिक्समध्ये चीनची आघाडी

या उपक्रमामागे चीनचा मोठा उद्देश आहे. वाढती लोकसंख्या, वृद्धत्वाकडे झुकणारी जनसंख्या आणि मंदावलेली अर्थव्यवस्था या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणे हे उद्देश आहेत.

चीनने मागील वर्षभरात रोबोटिक्स आणि एआय क्षेत्रात तब्बल 20 अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक केली असून, भविष्यात एआय आणि रोबोटिक्स स्टार्टअप्ससाठी 1 ट्रिलियन युआनचा निधीही जाहीर करण्यात आला आहे.

albert einstein robot - Robot mall at beijing
Cluely dating bonus | प्रेम जुळवा, बोनस मिळवा! ऑफिसमधील सहकाऱ्याला डेटवर पाठवल्यास रु. 42000 रोख मिळणार, Refer-a-Date स्कीम चर्चेत

थीम रेस्टॉरंट आणि रोबोट्सचा अनुभव

मॉलच्या शेजारी एक खास रोबोटिक थीम असलेले रेस्टॉरंट देखील उघडण्यात आले आहे. येथे आचाऱ्यापासून ते वेटरपर्यंत सर्व कामं रोबोट्स करतात. ग्राहकांना हे रोबोट्स प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते.

albert einstein robot - Robot mall at beijing
Pakistan airspace closure | भारताशी पंगा पाकिस्तानला महागात! विमानांना एअरस्पेस बंद केल्याने 'इतके' अब्ज रुपयांचे नुकसान

वर्ल्ड रोबोट कॉन्फरन्स आणि वर्ल्ड ह्युमनॉईड रोबोट गेम्स

‘रोबोट मॉल’चे उद्घाटन बीजिंगमध्ये सुरू झालेल्या पाच दिवसांच्या ‘वर्ल्ड रोबोट कॉन्फरन्स’च्या पहिल्याच दिवशी करण्यात आले. यंदाच्या कार्यक्रमात 200 हून अधिक देशी-विदेशी कंपन्यांच्या 1500 हून अधिक रोबोटिक उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत.

याचकाळात 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ‘वर्ल्ड ह्युमनॉईड रोबोट गेम्स’ या स्पर्धांमध्ये 20 हून अधिक देशांचे संघ सहभागी होणार असून, ट्रॅक अ‍ॅण्ड फील्ड, डान्स आणि फुटबॉल यांसारख्या स्पर्धांमध्ये रोबोट्स एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत.

या मॉलमुळे रोबोटिक्स हे तंत्रज्ञान केवळ प्रयोगशाळांपुरते न राहता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. बीजिंगमधील ‘रोबोट मॉल’ ही फक्त सुरुवात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news