Online Gaming Rules | १ मे पासून 'रिअल-मनी' गेमिंगवर बंदी! जाणून घ्या ऑनलाईन गेमिंगचे नवीन नियम

Online Gaming Rules | विना-पैशांचे ऑनलाईन गेम सक्‍तीच्‍या नोंदणीशिवाय सुरू राहणार
Online Gaming Rules
प्रातिनिधिक छायाचित्र. Pudhari
Published on
Updated on
Summary

ऑनलाईन गेमिंग कंपन्या आणि काही तज्ज्ञांसह सुमारे २,५०० जणांनी ऑनलाईन गेमिंग नियमांमध्ये थोडी सवलतीची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने ही मागणी फेटाळत आपला कडक पवित्रा कायम ठेवला आहे.

Online money gaming ban in India effective May 1 2025

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगबाबत अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. या नव्या नियमांनुसार, १ मे पासून भारतात रिअल मनी गेमिंग (पैशांची पैज लावून खेळल्या जाणाऱ्या सर्व ऑनलाईन गेम्स) वर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जाणून घेऊया नवीन 'ऑनलाईन गेमिंग कायदा २०२५' मधील नियमांविषयी...

'मनी गेमिंग' प्लॅटफॉर्मला भारतात बॅन

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, पैशांचा व्यवहार करणाऱ्या कोणत्याही ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर भारतात बंदी आहे. कायद्यांतर्गत त्यांची नोंदणी किंवा निर्धारण केले जाऊ शकत नाही.

Online Gaming Rules
India IT Rules 2021 Amendment | सोशल मीडियावर बातम्या पोस्ट करणाऱ्या युजर्सनाही करावे लागणार 'आयटी' नियमांचे पालन

अन्य ऑनलाईन गेमिंगबाबत सरकारचे लवचिक धोरण

सरकारने विना-पैशांच्या गेमिंग कंपन्यांसाठी नियमांमध्ये मोठी सवलत दिली असून त्यांच्यासाठी लवचिक धोरण स्वीकारले आहे. ऑनलाईन गेममध्ये कोणत्याही प्रकारे पैशांची पैज लावली जात नाही. तसेच ते केवळ मनोरंजनासाठी खेळले जातात, असे गेम्स विनाअडथळा सुरू राहतील. विशेष म्हणजे, ई-स्पोर्ट्ससारख्या काही निवडक खेळांची परवानगी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच अशा विना-पैशांच्या खेळांना आता सरकारी नोंदणी करण्याची सक्ती नसेल.

Online Gaming Rules
Raghav Chadha: मोबाईल डेटा न वापरता गायब होतोय; टेलिकॉम कंपन्यांचा स्कॅम? राघव चढ्ढांनी संसदेत उपस्थित केला मुद्दा

सरकारने कडक पवित्रा ठेवला कायम

ऑनलाईन पैशांच्या गेमिंगवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन गेमिंग कंपन्या आणि काही तज्ज्ञांसह सुमारे २,५०० लोकांनी सरकारला विनंती केली होती की, ऑनलाईन गेमिंग नियमांमध्ये थोडी सवलत द्यावी. ऑनलाईन गेमिंगची व्याख्या बदलावी. या कंपन्यांना भारतात काम करण्यासाठी वाव मिळावा, अशी मागणी होती. या मागण्यांना कचर्‍याची टोपली दाखवत सरकारने आपला कडक पवित्रा कायम ठेवला आहे. तसेच संपूर्ण गेमिंग क्षेत्रावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आणि नियमांचे पालन करून घेण्यासाठी सरकार एका स्वतंत्र नियामक मंडळाची स्थापना करणार आहे.

Online Gaming Rules
CJI Suryakant on Cyber Criminals | खुनी सुधारू शकतो; पण सायबर गुन्हेगारांना क्षमा नको : सरन्यायाधीश सूर्य कांत

मागील वर्षीपासून अंमलबजावणी

"मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगचा नवीन कायदा आणल्यानंतर, 'एमपीएल' (MPL), 'ड्रीम ११' (Dream11) आणि 'पेटीएम फर्स्ट गेम्स' सारख्या पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसला. या कडक नियमांमुळे या कंपन्यांना त्यांचे अनेक व्यवहार थांबवावे लागले किंवा काही ठिकाणी काम पूर्णपणे बंद करावे लागले."

Online Gaming Rules
TV Revolution: सेट-टॉप बॉक्सचा खेळ संपणार! अश्विनी वैष्णव यांनी केली मोठी घोषणा; फ्रीमध्ये पाहता येणार चॅनल्स

नवीन नियमामुळे ऑनलाईन गेमिंगवर संपूर्ण सरकारचे नियंत्रण

नव्याने अधिसूचित केलेल्या नियमांनुसार, केंद्र सरकारला विशिष्ट आदेश, मार्गदर्शक तत्त्वे किंवा निर्देशांद्वारे गेमिंग कंपन्यांना ट्रॅफिक डेटा, मेटाडेटा आणि इतर संबंधित माहिती भारतातील सर्व्हरवर साठवण्याचे निर्देश देण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news