TV Revolution: सेट-टॉप बॉक्सचा खेळ संपणार! अश्विनी वैष्णव यांनी केली मोठी घोषणा; फ्रीमध्ये पाहता येणार चॅनल्स

No Set-Top Box Needed: सरकारने सेट-टॉप बॉक्सशिवाय टीव्ही पाहण्याची नवी सुविधा सुरू केली आहे. नवीन टीव्हीमध्ये इन-बिल्ट सॅटेलाइट ट्यूनरमुळे DD Free Dish चॅनल्स थेट पाहता येतील.
No Set-Top Box tv
No Set-Top Box tvPudhari
Published on
Updated on

No Set-Top Box Needed: आता तुम्हाला सेट-टॉप बॉक्सशिवाय टीव्ही पाहता येणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अशा नव्या तंत्रज्ञानाची घोषणा केली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना कोणत्याही ‘सेट-टॉप बॉक्स शिवाय टीव्हीवर चॅनल्स पाहता येणार आहेत.

सेट-टॉप बॉक्सशिवाय टीव्ही पाहता येणार

सरकारने सादर केलेल्या नव्या टीव्ही मॉडेल्समध्ये इन-बिल्ट सॅटेलाइट ट्यूनर आणि स्मार्ट EPG (इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम गाईड) असेल. याचा अर्थ असा की, आता वेगळा सेट-टॉप बॉक्स लावण्याची गरज नाही.

दूरदर्शनच्या DD Free Dish प्लॅटफॉर्मवरील सर्व चॅनल्स थेट टीव्हीवर पाहता येणार आहेत. यामुळे वायरिंगची झंझट कमी होईल, अनेक रिमोट्स वापरण्याची गरज नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खर्चही वाचेल.

हे नवं तंत्रज्ञान काम कसं करणार?

या नव्या सिस्टीममध्ये टीव्हीमध्येच सॅटेलाइट सिग्नल पकडण्याची क्षमता असेल. म्हणजेच, डिश अँटेना जोडला की चॅनल्स थेट टीव्हीवर चालू होतील. सोबत दिलेलं EPG फीचर्समुळे चॅनल्स सहजपणे पाहता येतील, बदलता येतील. अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, “आता कंटेंट पाहण्यासाठी वेगळ्या डिव्हाइसची गरज नाही. प्रेक्षकांचा अनुभव अधिक चांगला होईल.”

No Set-Top Box tv
Raghav Chadha: मोबाईल डेटा न वापरता गायब होतोय; टेलिकॉम कंपन्यांचा स्कॅम? राघव चढ्ढांनी संसदेत उपस्थित केला मुद्दा

डिजिटल आणि क्रिएटिव्ह सेक्टरसाठी मोठी संधी

सरकारने डिजिटल क्षेत्राला चालना देण्यासाठी National AI Skilling Initiative ही योजना सुरू केली आहे. ही योजना Google आणि YouTube यांच्या सहकार्याने राबवली जात आहे. या उपक्रमाचा उद्देश मीडिया आणि कंटेंट क्रिएटर्सना AI तंत्रज्ञान शिकवणे, त्यांचं कौशल्यं वाढवणे आणि डिजिटल क्षेत्रात नवीन संधी निर्माण करणं हे आहे.

सरकारने MyWAVES नावाचं एक नवीन प्लॅटफॉर्मही लॉन्च केलं आहे. हे WAVES OTT चा भाग आहे. या प्लॅटफॉर्मवर क्रिएटर्सना स्वतःचा कंटेंट तयार करता येईल, शॉर्ट व्हिडिओ, वर्टिकल व्हिडिओ, वेब एपिसोड्स तयार करता येतील, आणि मल्टीलिंग्वल सपोर्टमुळे आपल्या भाषेत काम करता येईल. यामुळे छोट्या शहरांमधील क्रिएटर्सनाही मोठी संधी मिळणार आहे.

AI स्किलिंगमुळे बदलणार क्रिएटिव्ह इंडस्ट्री

या AI स्किलिंग प्रोग्रामद्वारे सुमारे 15,000 लोकांना ट्रेनिंग दिले जाणार आहे. यात

  • अॅनिमेशन

  • व्हिज्युअल इफेक्ट्स

  • गेमिंग

  • कॉमिक्स (AVGC)

  • मीडिया टेक्नोलॉजी

या क्षेत्रांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. यामुळे भारतातील क्रिएटिव्ह इंडस्ट्री अधिक मजबूत होईल आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनेल.

No Set-Top Box tv
Shane Warne: RRच्या विक्रीनंतर शेन वॉर्नच्या कुटुंबाला 460 कोटी रुपये मिळणार; एक निर्णय ठरला गेमचेंजर

‘ऑरेंज इकॉनॉमी’ला चालना

सरकारचा हा संपूर्ण फोकस ‘ऑरेंज इकॉनॉमी’वर आहे म्हणजेच कंटेंट, मीडिया, एंटरटेनमेंट आणि डिजिटल आर्ट्स या क्षेत्रांवर फोकस आहे. तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेचा मेळ घालून भारताला या क्षेत्रात जागतिक लीडर बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

प्रेक्षकांसाठी काय बदलणार?

या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी टीव्ही पाहणं अधिक सोपं, स्वस्त आणि स्मार्ट होणार आहे. आता सेट-टॉप बॉक्स खरेदीची गरज नाही, इंस्टॉलेशनचा खर्च नाही आणि अनुभव अधिक युजर-फ्रेंडली होणार आहे.

त्याचबरोबर, कंटेंट क्रिएटर्ससाठीही नव्या संधी निर्माण होणार आहेत. AI आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या मदतीने ते स्वतःची ओळख तयार करू शकतील आणि कमाईचे नवीन मार्ग शोधू शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news