INDIA Bloc Rally: दिल्लीत इंडिया आघाडीच्या महारॅलीला सुरुवात; राहुल गांधी, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव रामलीला मैदानाकडे निघाले

राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या महामेळाव्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांसह निघाले आहेत.
INDIA Bloc Rally
INDIA Bloc RallyFile Photo
Published on: 
Updated on: 

INDIA Bloc Rally

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या महामेळाव्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांसह निघाले आहेत.

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा, नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि इतर नेतही सोबत आहेत.

INDIA Bloc Rally
INDIA Bloc Rally in Delhi: ४,००० पोलीस आणि २०० सीसीटीव्ही: 'इंडिया' आघाडीच्या रॅलीसाठी दिल्ली पोलिसांचा तगडा बंदोबस्त

दिल्लीच्या सीमांवर वाहतूक कोंडी, काँग्रेस कार्यकर्त्यांचे पायीच प्रस्थान

पंजाब आणि हरियाणातून 'इंडिया' आघाडीच्या रॅलीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊन येणारी वाहने पोहोचल्यामुळे सोनीपत-दिल्ली कुंडली सीमेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. केजीपी-केएमपी झिरो पॉइंटजवळ कार, बस आणि ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस वाहनांची तपासणी करत होते आणि वाहतूक इतर मार्गांकडे वळवत होते.

अशीच परिस्थिती दिल्ली-गुरुग्राम सरहौल सीमेवरही दिसून आली, जिथे रॅलीसाठी जाणारी वाहने प्रचंड वाहतूक कोंडीत अडकली होती. त्रस्त झालेले काँग्रेस कार्यकर्ते पायीच दिल्लीच्या दिशेने निघाले; काहींनी पोलिसांचे बॅरिकेड्सही तोडल्याचे वृत्त आहे. गुरुग्राममधील काँग्रेस नेते पंकज डावर आणि वर्धन यादव यांनी सांगितले की, रॅलीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कार्यकर्ते आपला प्रवास पायीच सुरू ठेवतील.

रामलीला मैदानावर समर्थकांचा महासागर

दुसरीकडे, दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो समर्थक जमा झाले आहेत. हातात तिरंगा घेऊन आणि घोषणा देत हे समर्थक 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांच्या आगमनाची वाट पाहत आहेत. या भव्य रॅलीसाठी मैदानावर लोकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.

रामलीला मैदानावर 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांच्या प्रतीक्षेत समर्थकांचा महासागर दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो समर्थक जमा झाले आहेत. हातात तिरंगा घेऊन आणि घोषणा देत हे समर्थक 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या नेत्यांच्या आगमनाची वाट पाहत आहेत. या भव्य रॅलीसाठी मैदानावर लोकांची प्रचंड गर्दी उसळली असून, विरोधी पक्षांचा हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे.
INDIA Bloc Rally
CJP on INDIA bloc's rally : 'व्होट बचाव, देश बचाव'पासून 'CJP' दोन हात लांबच राहणार, दीपकेंनी घेतली ममता बॅनर्जींची भेट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.