CJP on INDIA bloc's rally : 'व्होट बचाव, देश बचाव'पासून 'CJP' दोन हात लांबच राहणार, दीपकेंनी घेतली ममता बॅनर्जींची भेट

'कॉकरोच जनता पार्टी'ची निष्पक्ष व्यासपीठही ओळख कायम ठेवणार
 CJP on INDIA bloc's rally
अभिजीत दीपके यांनी शनिवारी (३१ ऑक्टोबर) तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. Pudhari photo
Published on: 
Updated on: 

CJP on INDIA bloc's rally : 'कॉकरोच जनता पार्टी'चे (Cockroach Janata Party) संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक अभिजीत दीपके यांनी शनिवारी (३१ ऑक्टोबर) तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यावेळी त्‍यांनी इंडिया आघाडीच्‍या दिल्‍लीत आज होणार्‍या रामलीला मैदानावर होणाऱ्या 'व्होट बचाव, देश बचाव' आंदोलनास पाठिंबा दिला. मात्र इतर राजकीय पक्षांसोबत मुख्य मंचावर उपस्थित राहणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

ममता बॅनर्जी यांचे मानले आभार

ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर माध्‍यमांशी बोलताना अभिजीत दीपके म्‍हणाले की, "ममता बॅनर्जी यांची भेट तृणमूल आभार मानण्यासाठी होती. आम्ही 'नीट' (NEET) पेपर फुटीच्या विरोधात जंतरमंतरवर पहिले आंदोलन केले होते, तेव्हा त्यांनी तरुणांना पाठिंबा दिला होता. तसेच दिल्ली पोलिसांनी सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक केली होती, तेव्हाही ममता बॅनर्जी यांनी आम्‍हाला पाठिंबा दिला होता."

 CJP on INDIA bloc's rally
INDIA Alliance Mock Impeachment : इंडिया आघाडीच्‍या मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील प्रतीकात्मक 'महाभियोग'ला प्रारंभ

'सीजेपी एक स्वतंत्र व्यासपीठ'

रामलीला मैदानावर होणाऱ्या रॅलीत सीजेपीच्या सहभागाबाबत विचारलेल्या प्रश्नावर दीपके म्हणाले, "आम्ही रविवारी दिल्‍लात होणार्‍या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देतो. त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. मात्र, 'कॉकरोच जनता पार्टी' ही एक स्वतंत्र संघटना आणि निष्पक्ष व्यासपीठ आहे, आणि आम्ही ती तशीच ठेवणार असल्‍याचेही दीपके यांनी स्‍पष्‍ट केले.

 CJP on INDIA bloc's rally
Ravindra Jadeja ODI career : रवींद्र जडेजाची वन-डे कारकीर्द संपली? चेतेश्वर पुजाराने स्पष्ट सांगितला BCCIचा प्लॅन...

ममता बॅनर्जींनी केले सीजेपीचे कौतूक

'मत चोरी'च्या विरोधात लढणाऱ्या प्रत्येक गट आणि घटकाला सीजेपी पाठिंबा देईल. सीजेपी या चळवळीची सूत्रधार आहे. मला त्यांचा अभिमान आहे, अशा शब्‍दांमध्‍ये ममता बॅनर्जी यांनी सीजेपीचे कौतूक केले. आम्‍ही रविवारी होणार्‍या दिल्‍लीत होणार्‍या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. यावेळी ममता बॅनर्जी यांनी दीपक आणि सीजेपी टीमला पश्चिम बंगालमध्ये येण्याचे आणि तिथे आपले कार्यक्रम आयोजित करण्याचे निमंत्रणही दिले.

 CJP on INDIA bloc's rally
Omar Abdullah : मंत्रिमंडळ विस्तारानंतर CM ओमर अब्दुल्लांसमोर मोठं संकट; २१ आमदार 'नाराज', खासदारही देणार राजीनामा!

दिल्‍लीत आज 'व्होट बचाव, देश बचाव' मोर्चा

इंडिया आघाडीच्‍या वतीने आज (दि. १. नोव्‍हेंबर) दिल्‍लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या इंडिया आघाडीच्‍या वतीने 'व्होट बचाव, देश बचाव' आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा देण्‍याच्‍या आघाडीची प्रमुख मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.