IAS Officer Transfer: IAS असला म्हणून काय झालं... पब बाहेर पोलिसांवर हात उचलणाऱ्या बड्या अधिकाऱ्याची उचल बांगडी

विकास हे २०१९ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांच्यावर क्युबॉन पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
IAS Officer Suspended
IAS Officer Suspendedpudhari
Published on: 
Updated on: 

IAS Officer Transfer: आंध्र प्रदेश सरकारने कुप्पम एरिया डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट डायरेक्टर विकास मरमत यांच्या बदलीचे थेट परिपत्रक काढले आहे. बंगळुरूमध्ये IAS अधिकारी विकास आणि इतर तीन जणांनी पोलिसांवर हल्ला केला होता त्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांची थेट उचलबांगडी करण्यात आली.

IAS Officer Suspended
Deputy Election Commissioner : CJP आंदोलनाच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

उद्योगपती अन् कोचिंग सेंटरवाल्यासोबत पबमध्ये

विकास हे २०१९ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांच्यासोबत रिअल इस्टेट उद्योगपती अभय उदय सिंह, कोचिंग सेंटरचा मालक नितीश आणि बाऊन्सर रोशन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर क्युबॉन पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी १० ऑक्टोबरच्या रात्री पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यात इन्स्पेक्टर अरूण साळुंखे यांचा देकील समावेश आहे. हा प्रकार बंगळुरूमधील रेसिडेन्सी रोड वरील अपस्केल बार आणि रेस्तराँच्या बाहेर घडला.

IAS Officer Suspended
Simhastha Kumbh 2027: सिंहस्थ कुंभसाठी ३४ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची गरज का आहे? IAS सिंह यांची समजावून सांगितले

तरूण मुलींच्या वयाचा पुरावा मागितले अन्...

या प्रकरणी आएएस अधिकाऱ्याला मुख्य आरोपी करण्यात आलं आहे. त्याच्या इतर साथीदारांना सह आरोपी करण्या तआलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मरमत आणि इतर आरोपींनी त्यांच्या कृतीची सकाळी माफी मागितली आहे.

ज्यावेळी केंद्रीय गुन्हे शाखेची टीम रात्री उशिरा १.३० मिनिटांच्या आसपास पब्सची तपासणी करत होते. ही तपासणी एका मोहीमेअंतर्गत सुरू होती. त्यावेळी इन्स्पेक्टर अरूण साळुंखे यांच्या नेतृत्वातील टीमने काही तरूण मुलींना त्यांच्या वयाचा पुरावा मागितला.

IAS Officer Suspended
3 Children Policy : ‘प्रत्येक कुटुंबात किमान तीन मुले हवीत’ : मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे मोठे विधान

मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील अधिकारी

त्यावेळी चिडलेल्या मरमत आणि सिंह या दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर राज्य सरकारवर या आयएएस अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा दबाव वाढला. त्यानंतर राज्य सरकारने मरमत यांची नगरविकास खात्याच्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदावरून उचलबांगडी केली. ते कुप्पम जो मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या मतदार संघातील अधिकारी होते.

मुख्यमंत्र्यांनी १३ ऑक्टोबरला या प्रकरणी मुख्य सचिवांना सखोल चौकशीकरून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news