Vinesh Chandel I-PAC bail: ED ने विरोध बासनात बांधला! ज्या I-PAC वरून बंगाल पेटलं त्याच्या संचालकांना 'निकाला'आधीच जामीन मंजूर

Vinesh Chandel I-PAC bail
Vinesh Chandel I-PAC bailpudhari
Published on
Updated on

Vinesh Chandel I-PAC bail news: मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेले I-PAC चे संचालक आणि सह-संस्थापक विनेश चंदेल यांना गुरुवारी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला असून, विशेष म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या जामीन अर्जाला न्यायालयात विरोध केला नाही.

Vinesh Chandel I-PAC bail
SC on Mamata Banerjee | 'लोकशाही धोक्यात येईल ..." : ममता बॅनर्जींवर ताशेरे ओढताना सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्‍हणाले?

तपास यंत्रणेचे सहकार्य आणि अटी

पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चंदेल यांची सुटका झाली आहे. सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्याने (IO) दिलेल्या विधानाचा दाखला देत न्यायालयाने स्पष्ट केले की, तपासादरम्यान विनेश चंदेल यांनी पूर्ण सहकार्य केले आहे. याच कारणास्तव ईडीने त्यांच्या जामीन अर्जावर कोणतीही हरकत घेतली नाही.

तथापि, जामीन मंजूर करताना ईडीने काही कडक अटी घालण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने विनेश चंदेल यांना खालील अटींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत:

Vinesh Chandel I-PAC bail
Vinesh Chandel Arrested: बंगाल निवडणुकीआधी मोठी कारवाई! I-PAC संचालक विनेश चंदेल ED च्या ताब्यात; राजकीय वाद पेटला
  • ते पुराव्यांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करणार नाहीत.

  • या प्रकरणातील कोणत्याही साक्षीदारावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाहीत.

  • तपासात सातत्याने सहकार्य करतील आणि तपास यंत्रणांना आवश्यक असलेली सर्व माहिती उपलब्ध करून देतील.

Vinesh Chandel I-PAC bail
cbi officials jailed 3 months: बेकायदेशीर अटक प्रकरणी CBI च्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना ३ महिन्याचा तुरूंगवास

प्रकरणाची पार्श्वभूमी

विनेश चंदेल यांना मनी लाँड्रिंगच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली होती. यापूर्वीच्या सुनावणीत पटियाला हाऊस कोर्टाने चंदेल यांच्या जामीन अर्जावर ईडीला नोटीस बजावून उत्तर मागवले होते. गुरुवारी झालेल्या अंतिम सुनावणीत ईडीच्या मवाळ भूमिकेनंतर न्यायालयाने चंदेल यांची जामिनावर सुटका करण्याचा मार्ग मोकळा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news