Shocking News: नवऱ्याने शिकवलं, परीक्षा द्यायला लावली... कॉन्स्टेबल होताच पत्नी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली

Shocking News
Shocking Newspudhari
Published on
Updated on

husband trains wife constable elopes with boyfriend: पती पत्नींबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने पत्नीला शिकवून तिला सरकारी नोकरी लावण्यात हातभार लावला. मात्र आता तीच पत्नी पतीची साथ सोडून आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आहे. बिहारमधील बेगूसराय BSAP मध्ये या महिलेची पोस्टिंग होती. पतीने डालमियानगरमध्ये तक्रार दाखाल केली आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या आईने देखील मुलीच्या शोधात रोहतास एसपींच्या ऑफिसमध्ये पोहचली. त्यांनी देखील या प्रकरणाचा तपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

Shocking News
Nahsik Crime News | गणपती वर्गणीचा वाद ठरला प्राणघातक! सुरगाण्यातील 29 वर्षीय तरुणाची सापुताऱ्यात हत्या

हे प्रकरण डेहरीमधील डालमियानगरमधील आहे. इथं राहणाऱ्या अजय सिंह यांचा विवाह २६ जानेवारी २०२५ रोजी रोहतास येथील दरिहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अर्चना यांच्यासोबत झाला होता. कुटुंबीयांच्या मते, लग्न धूम धडाक्यात पूर्ण रिती रिवाजांनी करून देण्यात आलं होतं. लग्नानंतर अर्चनाने पतीला सांगितलं की ती नोकरी करू इच्छिते, तिने सरकारी नोकरीची तयारी करणार असं सांगितलं.

पती अजय सिंह यांनी दावा केला की, पत्नीची ही इच्छा आपण पूर्ण करण्यास पूर्ण सहाय्य केलं. डालमियानगरमधील एका कोचिंग सेंटरमध्ये तिला अॅडमिशन घेऊन दिलं. स्वतः नगर परिषदमध्ये एक खासगी नोकरी करत पत्नीच्या शिक्षणाचा खर्च उचलला. परीक्षा देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन गेलो.

Shocking News
Pune Crime News: मांसाहारी जेवणावरून वाद; मारहाणीत मुलाचा मृत्यू; आई-वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

घेतलेले कष्ट फळाला आले. अर्चना या परीक्षा पास झाल्या. त्यानंतर ट्रेनिंगसाठी त्यांना दरभंगा येथे पाठवण्यात आलं. घरात आनंदाचे वातावरण होत. कुटुंबातील लोकांना वाटलं की आता आयुष्य रूळावल आलं आहे. सरकारी नोकरी मिळाली आहे. घरची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. दोघांचे भविष्य चांगले असणार आहे.

मात्र अजय यांनी सांगितलं की इथूनच ट्विस्ट येऊ लागला. अर्चना बिहार पोलीसमध्ये कॉन्स्टेबल पदावर नोकरीला लागली. तिची पोस्टिंग बेगूसरायच्या BSAP मध्ये होती.

पतीने सांगितलं की नोकरी लागताच अर्चनाचे वागणे हळू हळू बदलू लागलं. तिचं बोलणं कमी झालं. दोघांमधील अंतर वाढलं. कुटुंबीयांनी सांगितलं की यादरम्यान, अर्चना दोनवेळा गर्भवती झाली. मात्र दोन्हीवेळा गर्भपात झाला. त्यानंतर पती पत्नी यांच्या नात्यात तणाव वाढला.

Shocking News
Crime News : गळा चिरलेला अन् शेवटचा श्वास... मृत्यूच्या दाढेतून महिलेने कागदावर रक्ताने लिहिले मारेकऱ्याचे नाव!

जुलै महिन्यात अर्चना सुट्टी घेऊन सासरी आली होती. त्यावेळी अजयने तिच्या मोबाईलवर विवेक नावाच्या युवकासोबतचे चॅटिंब पाहिले. अजयने सांगितलं की हे चॅटिंग पाहिल्यानंतर त्याला शंका आली. दोघांमध्ये वाद झाला अन् अर्चना घरातून निघून गेली.

पती अजयने अर्चना ही विवेकसोबत गेली आहे असा आरोप केला. अजयने याबाबत डालमियानगरमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुलगी घरातून गेल्यानंतर अर्चनाच्या आईने शकुंतला देवी यांनी देखील रोहतास एसपींकडे तक्रार केली. त्यांनी पोलिसांनी सर्व प्रकरणाची माहिती दिली. आपल्या मुलीचा शोध घेण्याची विनंती केली. आता पोलीसांसमोर अर्चना कुठं आहे हे एक मोठा प्रश्न आहे. ती खरोखरच विवेक कुमार सोबत आहे का? असेल तर कारण काय? पतीने केलेल्या आरोपात किती तथ्य आहे. या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहे. यात अर्चनाची बाजू देखील अजून समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news