UP Crime : पती नव्हे सैतानच! सात महिन्याच्या गर्भवती पत्नीच्या गळ्यात लॉकेट घालण्याचे नाटक करत चिरला गळा

Uttar Pradesh crime : धारदार शस्राने केले २० वार; चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृणपणे हत्या
 Uttar Pradesh crime News
चारित्र्याच्या संशयातून पतीने सात महिन्याच्या गर्भवती पत्नीची निर्घृणपणे हत्या केली.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सात महिन्याच्या गर्भवती पत्नीची पतीने चारित्र्याच्या संशयातून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या गळ्यात लॉकेट घालण्याच्या निमित्ताने पतीने पत्नीचा गळा चिरला. त्यानंतर तिच्यावर धारदार शस्राने २० वार करून तिची निर्दर्यीपणे हत्या केली. या क्रूर हल्ल्यात पत्नीसह तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ येथील अमेडा गावात घडली. पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर निर्दयी पतीने स्वत: पोलिसांशी संपर्क साधत पत्नीच्या हत्येची माहिती दिली. या घटनेने अमेडा गावातील भवनपूर गावात खळबळ उडाली आहे.

 Uttar Pradesh crime News
Bihar Superstition Murder| अंधश्रद्धेतून क्रुरतेचा कळस! लोकांनी घेरून एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळले

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमेडा गावातील भवनपूर येथील रहिवासी रविशंकर याचे सपना हिच्याबरोबर जानेवारीमध्ये लग्न झाले होते. काही दिवसांपासून रविशंकर तिच्या चरित्र्यावर संशय घेत होता. या कारणातून दोघांमध्ये खटके उडत होते. सात महिन्याची गर्भवती असणाऱ्या सापनाशी रविशंकर याचे आठ दिवसांपूर्वी भांडण झाले. त्यानंतर ती नाराज होऊन ममता या मोठ्या बहिणीच्या घरी आली. त्यानंतर त्याने पत्नीची माफी मागून तिची समजूत काढत तिला परत सासरी नेले.

प्रेमाचे नाटक रचून पत्नीला संपवले

घरी आणल्यानंतर रविशंकरने शनिवारी (दि. ३) सपनासाठी एक खास गिफ्ट आणल्याचे सांगितले. त्यानंतर तिला डोळे बंद करण्यास सांगितले. तिच्या गळ्यात लॉकेट घालण्याच्या निमित्ताने तिचा गळा चिरला व एका धारदार शस्राने तिच्यावर २० वार केले. त्यानंतर त्याने पोलिसांना स्वत: फोन करून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पतीला अटक केली असून पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

आई-बापाच्या मृत्यूनंतर मोठ्या बहीणीने केला होता सपनाचा संभाळ

आई-बापाच्या मृत्यूनंतर सपनाचा संभाळ तिच्या मोठ्या बहीणीने केला होता. आपल्या मोठ्या बहीणीकडेच सपना राहत होती. त्यानंतर २३ जानेवारीला मोठी बहीण ममता हिने सपनाचे लग्न रविशंकर यांच्याशी लावून दिले.

 Uttar Pradesh crime News
Ahmedabad Plane Crash | अवघ्या दोन दिवसांत नियतीने हिरावून घेतलं तिचं सौभाग्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news