Crime News: मैत्रिणीशी संबंध ठेवायला लावते, अश्लील व्हिडीओ दाखवून तशीच कृत्य कर म्हणते; पत्नीविरुद्ध पतीची पोलिसांत तक्रार

महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना ऐकल्या असतील, मात्र एका पतीनेच पत्नीच्या 'विचित्र' मागण्यांना कंटाळून पोलिसात तक्रार दाखले केल्याने खळबळ उडाली आहे.
bengaluru sexual harassment by wife
bengaluru sexual harassment by wifefile photo
Published on
Updated on

bengaluru sexual harassment by wife

बंगळूरू: आजपर्यंत महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना ऐकल्या असतील, मात्र बंगळूरूमध्ये पतीनेच पत्नीच्या विचित्र मागण्यांना कंटाळून पोलिसात तक्रार दाखले केल्याने खळबळ उडाली आहे. एका ३७ वर्षीय व्यक्तीने आपल्या ३१ वर्षीय पत्नीविरुद्ध लैंगिक छळ, मानसिक क्रूरता आणि अनैसर्गिक कृत्य करायला लावल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

'अश्लील व्हिडीओ दाखवते.., मैत्रिणीशी शरीरसंबंध ठेवायला लावते'

अमृतहल्ली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, पीडित पतीने आरोप केला आहे की, त्याची पत्नी त्याला तिच्या एका मैत्रिणीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सातत्याने भाग पाडत होती. इतकेच नव्हे तर, पत्नी त्याला अश्लील व्हिडीओ पाठवून तशीच कृत्ये करायला लावायची. आपल्या खासगी आयुष्यातील अत्यंत वैयक्तिक गोष्टी ती मित्रमैत्रिणींना सांगून आपला मानसिक छळ करत असल्याचेही पतीने तक्रारीत म्हटले आहे.

bengaluru sexual harassment by wife
नवरदेव, नवरी आणि पहिली रात्र…पतीचे 'ते' सत्‍य कळताच पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली!

पत्नी मद्यपान करते आणि मैत्रिणींसोबत वेळ घालवते

पतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, पत्नी मद्यपान करते. सारखी आपल्या मैत्रिणींसोबत फिरायला जाते. तिची आलिशान जीवनशैली सांभाळण्याइतपत पुरेसे पैसे कमवत नसल्याचे टोमणे ती वारंवार मारते. या वादावर तोडगा काढण्यासाठी ४ जुलै २०२४ रोजी कुटुबातील सदस्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, परंतु पत्नीच्या वर्तनात कोणताही बदल झाला नसल्याचा दावा पतीने केला आहे.

सासरच्यांनी पतीला स्वतःच्याच घरातून बाहेर काढले

पतीने केवळ पत्नीवरच नव्हे, तर सासरच्या मंडळींवरही गंभीर आरोप केले आहेत. वैवाहिक आयुष्यात हस्तक्षेप करून सासरच्यांनी खोटे आरोप करत त्याला स्वतःच्या घरातून बाहेर काढले. त्याचे सामान, पासपोर्ट तसेच शैक्षणिक कागदपत्रेही दिली नाहीत. तसेच त्याने पत्नीला दिलेले रोख पैसे आणि सोन्याचे दागिने परत देण्यासही नकार दिला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुसरीकडे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीनेही तामिळनाडूमध्ये एक एफआयआर दाखल केला असून, त्यात तिने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

bengaluru sexual harassment by wife
बलात्काराची तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या पतीला पोलिसाची मारहाण ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news