बलात्काराची तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या पतीला पोलिसाची मारहाण ?

पुंडलिकनगर ठाण्यातील प्रकार, फिट आल्याचा पोलिसांचा दावा, आरोपी वकील मात्र गजाआड
sambhajinagar crime news
बलात्काराची तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या पतीला पोलिसाची मारहाण ?file photo
Published on
Updated on

Police Officer beating Husband of Rape Victim Who Went to File a Complaint?

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बलात्काराची तक्रार देण्यासाठी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गेलेल्या पीडितेच्या पतीलाच एका अंमलदाराने कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी (दि.७) घडली. मारहाणीमुळे पती बेशुद्ध पडल्याचा आरोप आहे. मात्र पोलिसांनी या मारहाणीचा इन्कार केला असून, संबंधित व्यक्तीला फिट आल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी वकील किशोर गायकवाड याला अटक केली आहे.

sambhajinagar crime news
५ लाखांच्या कर्जासाठी ३२ लाखांची वसुली

२२ वर्षीय पीडित महिलेचे तिच्या पतीसोबत वाद सुरू असल्याने तिने पोटगीचा दावा दाखल करण्यासाठी वकील किशोर गायकवाड (२९, रा. चौका, फुलंब्री) याची भेट घेतली होती. फी पोटी २५ हजार रुपये ठरले होते, ज्यापैकी ५ हजार रुपये आगाऊ देण्यात आले होते. दरम्यान, ऑगस्ट २०२२ मध्ये पती-पत्नीमधील वाद मिटल्याने त्यांनी पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि वकिलाला केस बंद करण्यास सांगितले.

मात्र केस बंद करायची असेल तर उर्वरित २० हजार रुपये द्यावे लागतील, असा तगादा वकिलाने लावला. पैसे नसल्याचे सांगितल्यावर १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री आरोपी वकिलाने तिच्या घरात शिरून पैशाच्या बदल्यात शरीरस-खाची मागणी केली. नकार दिला असता त्याने बळजबरीने अत्याचार केला.

sambhajinagar crime news
शिवसेना उपतालुकाप्रमुखावरील चाकूहल्लाप्रकरणी तिघांना अटक

एवढ्यावरच न थांबता, त्याने या कृत्याचे व्हिडिओ शूट केले आणि ते व्हायरल करण्याची तसेच पती व मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन १३ आणि १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा अत्याचार केला. सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पती व नातेवाइकांसह पुंडलिकनगर ठाणे गाठले. पीडितेची तक्रार नोंदवून घेतली आणि अत्याचार करणाऱ्या आरोपी वकील किशोर गायकवाड याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक वर्षा काळे करत आहेत.

हुज्जत घालून स्वतःच पडल्याचा पोलिसांचा दावा याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले की, तक्रार दाखल करत असताना पीडितेच्या पतीने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी अवाजवी हुज्जत घातली. यादरम्यान त्यांना अचानक फिट आल्याने, पोलिसांनी तात्काळ त्यांना शासकीय वाहनातून घाटीत उपचारासाठी नेले. उपचारानंतर तक्रार घेऊन बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, पीडितेच्या पतीने ५ मार्च रोजी सिल्लोड पोलिस ठाण्यातही असाच गोंधळ घातला होता.

नेमके काय घडले? पीडितेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना पीडिता घडलेला प्रकार सांगून तातडीने गुन्हा दाखल करण्याची विनंती करत होती. यावेळी पीडितेचा पती आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यादरम्यान एका अंमलदाराने पतीच्या थेट कानशिलात मारली. जोराचा फटका बसल्याने ते जमिनीवर कोसळले व मोठा गोंधळ उडाला. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून, त्यात मारहाण करण्याची गरज नव्हती ना साहेब, असे एक जण पोलिसांना म्हणत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनीच त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. सत्य समोर येण्यासाठी ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, अशी मागणी पीडितेच्या पतीने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news