High Court Divorce Judgment : 'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही' : हायकोर्टाने घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला

कौटुंबिक न्यायालयाच्‍या निर्णयाविरोधात पत्‍नीने घेतली होती उच्‍च न्‍यायालयात धाव
High Court Divorce Judgment
AI Generator ImageAI Generator Image
Published on
Updated on
Summary

काय म्‍हणाले न्‍यायालय?

  • कोणत्‍याही पतीला आपली पत्‍नी व्‍यभिचारात गुंतलेली पाहणे सहन होणार नाही

  • रागाच्‍या भरता पत्‍नीचा फोन फोडणे, तिच्‍या प्रियकराशी असलेला संपर्क तोडणे हे मानवी स्‍वभावानुसार स्‍वाभाविक

  • कौटुंबिक न्यायालयांना सत्य शोधण्यासाठी कोणताही दस्तऐवज किंवा पुरावा स्वीकारण्याचे विशेष अधिकार

High Court Divorce Judgment

जबलपूर: "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात (अनैतिक संबंध) गुंतलेली पाहणे सहन होणार नाही. अशा परिस्थितीत रागाच्या भरात पत्नीचा मोबाईल फोडणे आणि तिचा प्रियकराशी असलेला संपर्क तोडणे हे मानवी स्वभावानुसार स्वाभाविक आहे," असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने पतीला कौटुंबिक न्‍यायालयाने दिलेला घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला.

दाम्‍पत्‍यामध्‍ये काय घडलं होते?

'बार अँड बेंच'च्‍या रिपोर्टनुसार, दाम्‍पत्‍याचा विवाह २००६ मध्‍ये झाला होता. पतीने पत्नीच्या अनैतिक संबंधांचे आरोप करत १७ नोव्हेंबर २०२१ रोजी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पतीने पुरावा म्हणून पत्नीच्या मोबाईलमधून स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतलेले काही आक्षेपार्ह फोटो आणि ते फोटो डेव्हलप करणाऱ्या फोटोग्राफरची साक्ष न्यायालयात सादर केली होती. कौटुंबिक न्यायालयाने हे पुरावे ग्राह्य धरून घटस्फोट मंजूर केला होता. या निर्णयाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

High Court Divorce Judgment
Supreme Court |'मृत्युपत्रा'च्या आधारे जमिनीची वारस नोंद करणे वैध : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

सादर केलेले फोटो बनावट असल्‍याचा पत्‍नीचा दावा

पत्नीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, पतीने आपला मोबाईल फोडला असून, सादर केलेले फोटो बनावट आहेत. पतीने सादर केलेले फोटो हे 'दुय्यम पुरावा' आहेत. भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ६५-बी नुसार आवश्यक असलेले प्रमाणपत्र नसल्यामुळे हे इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरले जाऊ नयेत.

High Court Divorce Judgment
Supreme Court | पैसे भरण्यास विलंब म्‍हणजे जमीन व्यवहार रद्द नव्हे : सर्वोच्‍च न्‍यायालय

तांत्रिक पुराव्यांबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

मध्‍य प्रदेश उच्‍च न्‍यायालयाचे न्यायमूर्ती विशाल धागत आणि न्यायमूर्ती बी.पी. शर्मा यांच्या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, कौटुंबिक न्यायालय अधिनियम कलम १४ नुसार, सत्य शोधण्यासाठी न्यायालय कोणताही अहवाल, दस्तऐवज किंवा माहिती पुरावा म्हणून स्वीकारू शकते, मग ती तांत्रिकदृष्ट्या पुरावा कायद्यात बसत असो वा नसो. कौटुंबिक वादाच्या प्रकरणांमध्ये पुरावा कायद्याचे तांत्रिक नियम कडकपणे लागू होत नाहीत. त्यामुळे कलम ६५-बी चे प्रमाणपत्र नसले तरी हे फोटो पुरावा म्हणून वैध ठरतात.

High Court Divorce Judgment
Supreme Court: मुदतीनंतर नूतनीकरण केलेले Driving Licence जुन्या तारखेपासून ग्राह्य धरले जाणार? कोर्टाचा निकाल वाचा

पतीचे कृत्‍य मानवी स्‍वभावानुसार स्‍वाभाविक

पतीने पत्नीच्या फोनमधील आक्षेपार्ह फोटो स्वतःच्या फोनमध्ये ट्रान्सफर केले आणि त्यानंतर संतापून तिचा फोन फोडला. पत्नीचा तिच्या प्रियकराशी संपर्क तोडणे हाच त्यामागचा उद्देश होता, जे मानवी स्वभावानुसार स्वाभाविक आहे. या प्रकरणी संबंधित फोटो डेव्हलप करणाऱ्या फोटोग्राफरने न्यायालयात प्रत्यक्ष साक्ष दिल्याने पतीची बाजू अधिक भक्कम झाली.रेकॉर्डवरील पुरावे, पत्नीची कबुली आणि फोटोंची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर, उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला. पत्नीची अपील फेटाळून लावत न्यायालयाने घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news