

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पत्नीला पॉर्न चित्रपट पाहण्याची तसेच तिला पॉर्न स्टारसारखे परिधान करण्याची सक्ती करणाऱ्या पतीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सततच्या शारीरिक, मानसिक छळानंतर शाहदरा भागात राहणाऱ्या संबंधित महिलेने पोलिसांत धाव घेतली होती.
लग्नाच्या तिसऱ्या दिवसापासून पतीने छळ करण्यास सुरुवात केली होती. पॉर्न चित्रपट पाहण्याबरोबर पॉर्न स्टारसारखे राहण्याची सक्ती तो करीत होता, असे महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शारीरिक आणि मानसिक छळासोबत हुंड्यासाठी पती, सासू, सासरे त्रास देत होते, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेतील विविध कलमांसह हुंडाविरोधीत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :