

पुढारी ऑनलाईन डेस्क : मी ऑगस्ट महिन्यात टोयोटा कंपनीची वाहने लाँच करत आहे. आता सर्व वाहने शेतकर्यांनी तयार केलेल्या इथेलॉनवर चालणार आहेत. यानंतर देशात पेट्रोल प्रति लीटर १५ रुपये होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. जाणून घेवूया गडकरी यांनी पेट्रोल स्वस्त होण्यामागील कोणते सूत्र सांगितले याविषयी…
राजस्थानमधील प्रतापगढ येथील सभेत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आता सर्व वाहने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या इथेनॉलवर चालतील. जर सरासरी ६०% इथेनॉल आणि ४० टक्के वीज घेतली तर पेट्रोल 15 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. याचा फायदा देशातील जनतेला होणार आहे. या धाेरणामुळे प्रदूषणात घट होईल तसेच शेतकरी अन्नदात्यापासून ऊर्जादाता बनेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता. मात्र इतकी वर्षे राज्य करूनही गरिबी हटवता आलेली नाही. या काळात एक गोष्ट नक्कीच घडली की काँग्रेसने आपल्या लोकांची गरिबी दूर केली, असा टोलाही गडकरी यांनी या वेळी लगावला.