Himalayas Earthquakes: हिमालय सतत का थरथरतोय...? गेल्या महिन्याभरात तब्बल १३० भूकंपाचे झटके

Himalayas Earthquakes
Himalayas Earthquakespudhari
Published on
Updated on

Himalayas Earthquakes: हिमालय हा गेल्या महिन्याभरात सतत थरथरतोय. नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजीच्या रेकॉर्ड्सचे विश्लेषण केले असता हिमालयन बेल्ट आणि त्याच्याशी निगडीत असलेला हिंदूकुश क्षेत्रात महिन्याभरात जवळपास १३० भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होण्यात भारतीय हिमालय सर्वात आघाडीवर आहे. इथं अशा ६३ घटनांची नोंद झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये २६ तर नेपाळमध्ये १० असे भूकंप आले आहेत. पश्चिमी हिमालय याबाबतीत सर्वात सक्रीय राहिल्याचे दिसून येते. लडाख, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात एकूण ३६ भूकंपीय घडामोडी नोंदवल्या गेल्या आहेत.

Himalayas Earthquakes
Nepal Disaster: राज्यातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न जारी; रिचा टूर्समधील ६० नागरिक अद्याप संपर्काबाहेर

लडाख सर्वात आघाडीवर असून १३ ऑगस्टमध्ये इथं १० किलोमीटर खोलीवर ५.५ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. याच दिवशी ४.३ तीव्रतेचा अजून एक भूकंपाचा झटका बसला होता. २६ ऑगस्ट रोजी शिमलाजवळ ४.० रिक्टर स्केलचा तर लडाखमध्ये ४.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता. हिमाचलच्या कांगडा चंबा तसेच जम्मू काश्मीरच्या डोडा - किश्तवाडमध्ये देखील छोट्या प्रमाणात भूकंपाचे धक्का बसले आहेत.

Himalayas Earthquakes
Nepal Flood: काही तासांचा फरक अन् जीव वाचला! नेपाळच्या महापुरातून प्रदीप तेंडुलकर थोडक्यात बचावले

हिंदूकुश - पामीर भागात मोठे झटके

हिंदूकुश - पामीर क्षेत्रात १०० ते १८० किमी खोल भूगर्भात जास्त भूकंपांची नोंद झाली आहे. तर पश्चिमी मध्य हिमालयमध्ये लडाख पासून हिमाचलपर्यंत ३ ते १५ किमी खोल छोटे आणि मध्यम झटके आले होते होते. पूर्व हिमालयात सिक्कीम, अरूणाचल आणि तिबेटला लागून असलेल्या भागात देखील भूकंपाची नोंद झाली आहे.

Himalayas Earthquakes
Nepal Floods | नेपाळमधील मृतांचा आकडा ९०३; आपत्तीच्या १२ दिवस आधी इशारा दिल्याचा चीनचा दावा

उत्तराखंडमध्ये सात भूकंप

मध्य आणि पूर्व हिमालयात उत्तराखंडमध्ये भूकंपीय घटना कमी झाल्या आहेत. बागेश्वर, चमोली, टिहरी, उत्तरकाशी आणि पिथौरागडमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त रिक्टर स्केलचे सात भूकंप नोंदवले गेले आहेत. नेपालमध्ये अशा १० घटनांची नोंद झाली आहे. यातील सर्वात मोठा झटका हा १९ ऑगस्ट रोजी बसला होता. त्याची तीव्रता ४.० रिक्टर इतकी होती. याचा केंद्रबिंदू हा काठमांडू पासून १४९ किलोमीटर पश्चिम उत्तर पश्चिममध्ये होता.

Himalayas Earthquakes
Nepal Floods : भोटेकोशी नदीला पुन्हा पुराचा धोका; मृतांची संख्या ७८१ वर, हजारो बेपत्ता

दिल्लीपर्यंत हादरे

हिमालयातील शक्तीशाली भूकंपाचा पहिला प्रभाव हा उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लड्डाख आणि हिमाचलच्या पर्वतीय भागात जाणवतो. त्यानंतर देहरादून, ऋषिकेश, हरिद्वार, उत्तरकाशी, चमोली आणि रूद्रप्रयागपर्यंत याचे तीव्र झटके जाणवतात. उत्तर प्रदेशच्या सहारनपूर, बिजनौर, मेरठ आणि मुजफ्फरनगरसोबतच दिल्ली एनसीआरपर्यंत देखील याचे झटके दिसून येतात.

वाडिया हिमालय भू - विज्ञान संस्थेच्या संचालक विनीत गहलोत यांनी सांगितलं की, सतत छोटे भूकंप येणे ही काही मोठ्या भूकंपाची भविष्यवाणी नाही. मात्र हिमालय हा सक्रीय प्लेटच्या बॉर्डरवर आहे. त्यामुळं सतत घडामोडींवर नजर ठेवावी लागते. तसेच भूकंपरोधी बांधकाम गरजेचं असतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news