Viral Video: घराबाहेरील पेरू तोडले, निवृत्त सैनिकाने चिमुरडीला साखळदंडाने बांधून बेदम मारले; व्हिडिओ पाहून डोळ्यातून पाणी येईल

घराबाहेरच्या झाडाचे पेरू तोडल्याच्या कारणावरून एका निवृत्त सैनिकाने अल्पवयीन मुलीला साखळदंडाने बांधून बेदम मारहाण केली.
Viral Video child abuse Himachal Pradesh
Viral Video child abuse Himachal Pradeshfile photo
Published on
Updated on

Viral Video child abuse Himachal Pradesh

हिमाचल प्रदेश: घराबाहेरच्या झाडाचे पेरू तोडल्याच्या कारणावरून एका निवृत्त सैनिकाने अल्पवयीन मुलीला साखळदंडाने बांधून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या अमानवीय घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घरात नेऊन साखळदंडाने बांधले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही एका स्थलांतरित कुटुंबातील आहे. आरोपीच्या घराबाहेर असलेल्या झाडाचे मुलीने पेरू तोडले. हे पाहिल्यानंतर निवृत्त सैनिकाने तिला फरफटत घरामध्ये नेले. तेथे तिला जिन्याच्या लोखंडी खांबाला साखळदंडाने बांधून ठेवत अमानुषपणे मारहाण केली.

Viral Video child abuse Himachal Pradesh
Crime News: मैत्रिणीशी संबंध ठेवायला लावते, अश्लील व्हिडीओ दाखवून तशीच कृत्य कर म्हणते; पत्नीविरुद्ध पतीची पोलिसांत तक्रार

व्हिडिओमुळे प्रकार उघडकीस

मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या रोहित नावाच्या एका स्थानिक तरुणाने हा सर्व प्रकार पाहिला आणि त्याचा व्हिडिओ केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही चिमुरडी रडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी आपल्या कृत्याचे समर्थन करताना दिसत असून, "हिने पेरू चोरले आहेत," असे ओरडून सांगत आहे. यावेळी व्हिडिओ करणाऱ्या तरुणाने आरोपीला जाब विचारत या कृत्याबद्दल सुनावले.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

रोहितने तत्काळ चाईल्ड हेल्पलाईन आणि स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने आरोपीची चौकशी केली असून पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे. पीडित कुटुंबाचे जबाब नोंदवण्यात आले असून, आरोपी निवृत्त सैनिकावर कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"मी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवले. सुरुवातीला आरोपीने आरडाओरडा केला, मात्र नंतर त्याने पीडित कुटुंबाची माफी मागून आपली चूक कबूल केली. पण अशा प्रकारे लहान मुलांवर अत्याचार करणे निंदनीय आहे."

- रोहित (सैनिक मर्चंट नेव्ही)

Viral Video child abuse Himachal Pradesh
बलात्काराची तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या पतीला पोलिसाची मारहाण ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news