

Haryana Wife Kills Husband And Cuts Open Stomach: हरियाणाच्या कुरूक्षेत्रमध्ये रविवारी एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या पतीची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली होती. त्यानंतर ही महिला तिथेच थांबली नाही. तिने आपल्या नवऱ्याचे पोट फाडून त्याचा कोथळा बाहेर काढला. ती हा कोथळा पिशवत भरू लागली. त्याचवेळी घर मालक तिथं पोहचला अन् सर्व प्रकरण चव्हाट्यावर आलं. या घटनेबाबत अजून धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश आणि विमला हे दोघे एका भाड्याच्या घरात गेल्या वर्षभरापासून रहात होते. मृत राजेश हा मुळचा उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्याचा रहिवासी होता. तो करूक्षेत्र इथं पेहोवा रोडजवळील एका वॉटर ट्रेडिंग कंपनीत पुरवठा विभागात काम करतोय. राजेश आणि विमल यांच्या लग्नाला अनेक वर्षे झाली असून त्यांना अपत्य नाहीये.
घर मालक रिंकू यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी ५ वाजता पती आणि पत्नी यांचा आरोडण्याचा आवाज ऐकू आला. ज्यावेळी आरडा ओरडा वाढला त्यावेळी रिंकू छताच्या दिशेने पळाले. त्यांनी तिथं जे दृष्य पाहिलं ते पाहून त्याला मोठा धक्काच बसला. राजेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या पोटावर मोठे घाव होते. त्यांची पत्नी विमला नवऱ्याच्या पेटातून बाहेर आलेला कोथळा उचलून पिशवीत टाकत होती.
घर मालक अचानक समोर आल्यानंतर विमला देवी पूर्णपणे घाबरल्या. त्यांनी त्वरित छतावरून खाली उडली मागली. मात्र उंचावरून उडी मारल्यामुळं ती गंभीर जखमी झाली अन् त्यामुळं तिला पळता आलं नाही. सध्या तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून पोलीस तिचा जबाब नोंदवत आहे.
शवविच्छेदनाच्या अहवालात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राजेशच्या पोटात कोणत्यातरी धारदार शस्त्राने तब्बल ३५ सेंटीमीट लांब कट लावण्यात आला होता. त्यानंतर त्याचा कोथळा बाहेर आला. त्यानंतर असं लक्षात आलं की राजेशच्या लिव्हरचा मोठा भाग आणि डाव्या बाजूची किडनी गायब आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून वेगवेगळ्या साईजचे ३ चाकू जप्त केले आहेत. घर मालकाने सांगितलं की या जोडप्यामध्ये सातत्याने भांडणे होत होती. तसेच विमला देवी या तंत्र-मंत्र सारख्या अघोरी कृत्यात देखील सामील असायची. राजेशच्या हत्येमागचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नसून पोलीस तपास करत आहेत.