Crime News : न्यायाधीशांच्या खात्यातून ७ लाख हडपून असिस्टंट पळाला स्पेनला

वेदांतनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल; सीएकडे इन्कम टॅक्स भरताना प्रकार उघड
 Fraud case
Crime News : न्यायाधीशांच्या खात्यातून ७ लाख हडपून असिस्टंट पळाला स्पेनलाFile Photo
Published on
Updated on

Crime News: Assistant fled to Spain after grabbing 7 lakhs from the judge's account

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गेल्या पाच वर्षांपासून विश्वासाने सोबत काम करणाऱ्या एका असिस्टंटनेच ८६ वर्षीय निवृत्त न्यायाधीशांच्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख ३ हजार २०० रुपये परस्पर वळते करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक केल्यानंतर हा आरोपी उच्च शिक्षणासाठी चक्क स्पेनला पळून गेला आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Fraud case
Maratha Kranti Morcha : मंत्री विखे कोणाला घाबरतात ? ; मराठा क्रांती मोर्चाचा सवाल

अनंता पंढरीनाथ सुरवसे (मूळ रा. परतूर, जि. जालना) असे आरोपी असिस्टंटचे नाव आहे. फिर्यादी दशरथ राधाकृष्ण शेळके (८६, रा. वेदांतनगर, रेल्वे स्टेशन रोड) यांच्या तक्रारीनुसार, ते १९९४ मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयातून न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले असून, सध्या ते छत्रपती संभाजीनगर खंडपीठात वकिली करतात.

आरोपी अनंता सुरवसे हा गेल्या ५ वर्षांपासून दशरथ शेळके यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम पाहत होता. शेळके यांचे बहुतांश ऑनलाईन पैशांचे व्यवहार तोच करत असे. त्यामुळे त्याला त्यांच्या मोबाईलचा आणि 'फोन पे'चा पासवर्ड माहीत होता. याच विश्वासाचा गैरफायदा घेत, अनंता याने १ मे २०२५ ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शेळके यांच्या एसबीआय बँक खात्यातून तानाजी सुपेकर, अझहर ए.के., साक्ष आणि दीप्ती अशा वेगवेगळ्या व्यक्तींच्या खात्यावर तसेच स्वतःच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने तब्बल ७ लाख ३ हजार २०० रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर अवघ्या एका दिवसात, म्हणजेच २ ऑक्टोबर २०२५ रोजी तो शिक्षणासाठी स्पेनला निघून गेला.

 Fraud case
FDA : जेवणाच्या ताटात दुर्गंधीयुक्त पनीर अन् जिवंत किडे !

पासवर्ड माहीत असल्याने केला विश्वासघात

त्यानंतर शेळके यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता, त्यांच्या खात्यातून तानाजी सुपेकरकडे गेलेल्या पैशांचा तपशील आणि मोबाईल क्रमांक मिळाला. सुपेकरला फोन करून अनंताबद्दल विचारणा केली असता, त्याने फोन कट केला. यावरून अनंतानेच पासवर्डचा गैरवापर करून फसवणूक केल्याची शेळके यांची खात्री झाली. या फसवणुकीनंतर दशरथ शेळके यांनी सुरुवातीला ऑनलाईन सायबर पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. तिथून हा गुन्हा वेदांतनगर ठाण्यात वर्ग झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार करत आहेत.

इन्कम टॅक्स भरताना फुटले बिंग

१५ जुलै २०२६ रोजी दुपारी दशरथ शेळके हे त्यांचे सीए सुनील काला यांच्याकडे इन्कम टॅक्स भरण्यासाठी गेले होते. बँक स्टेटमेंट तपासत असताना, सीए काला यांच्या लक्षात आले की, तानाजी सुपेकर (५,५४,४००/-), अनंता सुरवसे (५०,०००/-), अझहर ए. के. (६०,०००/-), साक्ष (३५,०००/-) आणि दीप्ती (३,८००/-) यांच्या खात्यांवर मोठ्या रकमा ट्रान्सफर झाल्या आहेत. त्यांनी शेळके यांना या व्यक्तींबद्दल विचारणा केली असता, "मी फक्त अनंता सुरवसेला ओळखतो, इतर कोणालाही मी पैसे पाठवलेले नाहीत," असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news