Crime News: "जबाबदाऱ्यांमधून मुक्त व्हायचं होतं..." पतीनेच रात्रीच्या अंधारात पत्नी अन् १५ वर्षांच्या मुलीचा गळा चिरला

आर्थिक विवंचना आणि मानसिक आजाराच्या भरात एका ४८ वर्षीय व्यक्तीने आपल्याच पत्नीची आणि १५ वर्षांच्या मुलीची गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.
Crime news
Crime newsFile Photo
Published on
Updated on

Crime News

गाझियाबाद: आर्थिक विवंचना आणि मानसिक आजाराच्या भरात एका ४८ वर्षीय व्यक्तीने आपल्याच पत्नीची आणि १५ वर्षांच्या मुलीची गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. गाझियाबादमधील खोडा परिसरातील लोकप्रिय विहार येथे शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या हल्ल्यात १४ वर्षांची दुसरी मुलगी किरकोळ जखमी झाली असून ती सुदैवाने बचावली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी पतीला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे.

मोहम्मद राजा अंसारी (वय ४८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, बेबी तबस्सुम (वय ४३) असे मृत पत्नीचे आणि तरनुम (वय १५) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने शुक्रवारी रात्री पत्नीवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. आईचा वाचवा-वाचवा असा आवाज ऐकून १५ वर्षांची मुलगी धावत आली; मात्र नराधम बापाने तिच्यावरही चाकूने वार केले. या दुर्घटनेत दोघींचाही जागीच मृत्यू झाला.

Crime news
Crime News: विभक्त राहत असलेली पत्नी परत यावी म्हणून नरबळी! जेवणासाठी घरी बोलावून तरूणाच मुंडक तोडलं अन् पूजेच्या घरात पुरलं

औषधे बंद केल्याने प्रकार घडला

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अंसारी २०२२ पासून मानसिक आजाराने ग्रस्त होता आणि गेल्या दीड महिन्यापासून त्याने वैद्यकीय उपचार व औषधे घेणे बंद केले होते. औषधे पुन्हा सुरू करण्यावरून पत्नीसोबत त्याचा वाद झाला होता. यातूनच त्याने गाझीपूर बाजारातून चाकू खरेदी करून कुटुंबाचा खात्मा करण्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.

"जबाबदाऱ्यांमधून मुक्त होण्यासाठी हे पाऊल उचलले"

"घरखर्च चालवणे कठीण झाले होते आणि आजारपणामुळे मी प्रचंड तणावात होतो. या सर्व जबाबदाऱ्यांमधून कुटुंबाची अन् माझी मुक्तता व्हावी म्हणूनच मी हे कृत्य केले. तेव्हा मला हे योग्य वाटले, पण आता मला पश्चात्ताप होत आहे," अशी कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली. या प्रकरणात वाचलेल्या १४ वर्षांच्या मुलीच्या तक्रारीवरून खोडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Crime news
Crime News: धक्कादायक! नेहमी आईचीच बाजू घेतात... म्हणून संतापलेल्या बापाने दोन मुलांना कालव्यात ढकललं अन् पोलिसांना फोन केला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news