Crime News : अंगाचा थरकाप उडवणारी घटना! पत्नीचे शिर कापून फ्रीजमध्ये ठेवले; पतीच्‍या अघोरी कृत्याने पोलीसही हादरले

६ महिन्यांपूर्वीच झालेल्‍या विवाहाचा भयंकर शेवट, पतीने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत दिली गुन्ह्याची कबुली
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Guwahati murder case : एका २५ वर्षीय विवाहितेची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. आसाममधील गुवाहाटी येथील वसिष्ठापूर भागात मारेकऱ्याने हत्येनंतर मृतदेहाचे मुंडके छाटून प्लास्टिकच्या पिशव्हीत गुंडाळून फ्रीजमध्ये लपवून ठेवले होते, तर हाताची बोटेही कापून टाकली होती. याप्रकरणी मृत महिला रिया तालुकदार गोस्वामी हिच्या पतीने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे.

फ्लॅटमधून प्रचंड दुर्गंधी, शेजार्‍यांनी पोलिसांना दिली माहिती

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुवाहाटीतील एका फ्लॅटमधून प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. रविवारी रात्री पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, समोरचे दृश्य पाहून पोलिसांच्याही अंगाचा थरकाप उडाला. रियाचा रक्ताळलेला मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडला होता आणि तिचे छाटलेले मुंडके फ्रीजमध्ये साठवून ठेवले होते.

Crime News
Crime News : गळा चिरलेला अन् शेवटचा श्वास... मृत्यूच्या दाढेतून महिलेने कागदावर रक्ताने लिहिले मारेकऱ्याचे नाव!

पतीने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत दिली गुन्ह्याची कबुली

गुवाहाटी पोलिसांचे अप्पर उप-पोलीस आयुक्त (पूर्व) अनुराग शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येप्रकरणी रियाचा पती रामानुजन गोस्वामी हाच मुख्य आरोपी आहे. घटनेनंतर त्याने स्वतःहून पोलिसांत हजर होवून हत्येची कबुली दिली. प्राथमिक तपासानुसार, हा हत्याकांड मृतदेह सापडण्याच्या सुमारे ४८ तास आधी घडला असावा असा अंदाज आहे.

Crime News
Crime News : फोटोग्राफरच्‍या मृत्यूनंतरही प्रेयसीला येत राहिले २० दिवस मेसेज; एका बॅगने उघड केलं भयंकर सत्‍य!

सहा महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

रिया आणि रामानुजन यांचा विवाह अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच झाला होता. त्‍यांनी फ्लॅट भाड्याने घेतला होता. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणावरून हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्र जप्त केले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (GMCH) येथे पाठवण्यात आला असून, हत्येमागील नेमके कारण काय होते, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.

Crime News
Crime News | भयंकर..! अत्याचार करून नर्सची हत्या अन् नराधम थेट गॅरेजमध्ये जाऊन झोपला!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news