High Court Ruling |कॉलेजच्या मान्यता वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकत नाही : होमिओपॅथी कॉलेजबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय

विद्यार्थ्यांची पदवी, प्रॅक्टिसचा परवाना मान्‍यता नाकारता येणार नसल्‍याची स्‍पष्‍टोक्‍ती
High Court Ruling |कॉलेजच्या मान्यता वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकत नाही : होमिओपॅथी कॉलेजबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय
Published on
Updated on

High Court on college recognition dispute

अहमदाबाद : महाविद्यालयाच्या मान्यतेवरून सुरू असलेल्या न्यायालयीन वादामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्‍य टांगणीला लावता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल गुजरात उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच होमिओपॅथी डॉक्टरांच्‍या पदवी, प्रॅक्टिसचा परवाना मान्‍यता नाकरता येणार नसल्‍याचेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

आयुष मंत्रालयाने नाकारली होती कॉलेजांची मान्‍यता

पारुल युनिव्हर्सिटीसह इतर शैक्षणिक संस्थांनी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाविरुद्ध याचिका दाखल केल्या होत्या. होमिओपॅथी सेंट्रल कौन्सिलचा अनुकूल तपासणी अहवाल असतानाही, मंत्रालयाने २०१६-१७ शैक्षणिक वर्षासाठी या कॉलेजांची मान्यता नाकारली होती. २०१३ च्या नियमावलीनुसार काही त्रुटी असल्याचे कारण मंत्रालयाने दिले होते.मात्र, २०१६ मध्ये न्यायालयाने एका अंतरिम आदेशाद्वारे या महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया राबवण्यास परवानगी दिली होती. या आदेशाच्या आधारावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आता आपला अभ्यासक्रम पूर्ण केला.

High Court Ruling |कॉलेजच्या मान्यता वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकत नाही : होमिओपॅथी कॉलेजबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय
Bombay High Court Child Custody Ruling: सहा वर्षांच्या मुलीचा ताबा वडिलांना नकार; आईकडेच राहणार संगोपन

औपचारिक मान्यतेअभावी विद्यार्थ्यांना अडचण

विद्यार्थ्यांनी पदवी पूर्ण केली असली तरी औपचारिक मान्यतेअभावी त्यांना नोंदणी आणि परवाना मिळवण्यात अडचणी येत आहेत. स्वतःच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, असा युक्‍तीवाद विद्यार्थ्यांच्या बाजूने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील डी.सी. दवे यांनी केला.

High Court Ruling |कॉलेजच्या मान्यता वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकत नाही : होमिओपॅथी कॉलेजबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय
High Court News| ‘खरा प्रियकर कधीच ब्लॅकमेल करत नाही’: 'खासगी' क्षण चित्रित करणाऱ्याला हायकोर्टाचा दणका; जामीन अर्ज फेटाळला!

कॉलेज सुरूच राहील, मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होईल : उच्‍च न्‍यायालय

विद्यार्थ्यांच्या दयनीय स्थितीची दखल घेताना न्यायमूर्ती निर्झर एस. देसाई यांनी नमूद केले की, "या टप्प्यावर जर गुणवत्तेच्या आधारावर याचिका फेटाळल्या गेल्या, तर त्याचा सर्वाधिक फटका त्या विद्यार्थ्यांना बसेल जे न्यायालयासमोर पक्षकारही नाहीत. कॉलेज सुरूच राहील, मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होईल."

High Court Ruling |कॉलेजच्या मान्यता वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकत नाही : होमिओपॅथी कॉलेजबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय
High Court ruling | 'जा- मर' म्हणणं म्‍हणजे जीवन संपविण्‍यासाठी प्रवृत्त करणे नव्हे! : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

प्रॅक्टिससाठी परवाना देण्‍याचे आदेश

न्यायालयाने संबंधित प्राधिकरणांना आदेश दिले आहेत की, ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांना प्रॅक्टिससाठी परवाना आणि महाविद्यालयाला 'लेटर ऑफ परमिशन' (LOP) सह आवश्यक असणाऱ्या सर्व मान्यता प्रदान कराव्यात. या मान्यता अशा प्रकारे देण्यात याव्यात जणू त्या संबंधित काळातच मिळाल्या होत्या, जेणेकरून उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पदव्या वैध ठरतील.

High Court Ruling |कॉलेजच्या मान्यता वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकत नाही : होमिओपॅथी कॉलेजबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय
High Court : भाडेकरूंचा पुनर्विकासाचा हक्क बिल्डरच्या व्यावसायिक हितापेक्षा श्रेष्ठ

याचिकाकर्त्या संस्थेला २५,००० रुपये दंड

याचिकाकर्त्या विद्यापीठांवर ताशेरे ओढले आहेत. बाधित विद्यार्थ्यांना या याचिकेत पक्षकार न केल्याबद्दल न्यायालयाने प्रत्येक याचिकाकर्त्या संस्थेला २५,००० रुपये दंड ठोठावला आहे. ही रक्कम 'हायकोर्ट लीगल सर्व्हिसेस कमिटी'कडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणतेही व्यापक कायदेशीर प्रश्न न ठरवता, केवळ "ज्या विद्यार्थ्यांचा कोणताही दोष नाही त्यांचे नुकसान टाळण्यासाठी" हा निकाल दिला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news