Cow Slaughter Case: गोहत्या प्रकरणात तिघांना जन्मठेप! निकाल देताना न्यायालयाने वेद आणि मनुस्मृतीचा उल्लेख का केला? काय आहे प्रकरण?

Gujarat Cow Slaughter Case: गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने गोहत्या प्रकरणात तीन मुस्लिम आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Gujarat Cow Slaughter Case
Gujarat Cow Slaughter CasePudhari
Published on: 
Updated on: 

Gujarat Cow Slaughter Case: गुजरातमधील गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने गोहत्या प्रकरणात तीन मुस्लिम आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालात न्यायालयाने हिंदू धर्मातील वेद आणि मनुस्मृती या ग्रंथांचा उल्लेख करत गायींचे महत्त्व स्पष्ट केले. सध्या या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू आहे.

गोहत्या प्रकरणात तिघांना जन्मठेप

डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. निकालाच्या सुरुवातीच्या चार पानांमध्ये न्यायालयाने गायींचे महत्त्व आणि हिंदू धर्मातील त्यांचे स्थान याविषयी भाष्य केले.

यासाठी न्यायालयाने वेद आणि मनुस्मृतीतील संदर्भांचा उल्लेख केला. गायीला विश्वाची माता मानले जाते आणि तिच्यात ३३ कोटी देवतांचा वास असल्याची धार्मिक मान्यता आहे, असे न्यायालयाने नमूद केले. मनुस्मृतीचा उल्लेख करताना गायीला केवळ एक प्राणी न मानता धर्माशी संबंधित महत्त्वाचे स्थान असल्याचेही सांगण्यात आले.

या प्रकरणातील वसीम कुरेशी, मोहम्मद रफिक कुरेशी आणि असफाक बहेलिम या तिघांना गायीचे धार्मिक महत्त्व माहीत असूनही त्यांनी निर्दयपणे गोहत्या केल्याचे न्यायालयाने म्हटले.

कायद्यानुसार शिक्षा न झाल्यास भविष्यात गायींचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.

मांस विक्रीसाठी गोहत्या केल्याचा आरोप

न्यायालयात सादर झालेल्या माहितीनुसार, हे तिघे आरोपी कमी किमतीत जुन्या किंवा दूध न देणाऱ्या गायी खरेदी करत होते. त्यानंतर त्यांची कत्तल करून मांस विक्रीचा व्यवसाय केला जात होता. पोलिसांनी मांस विक्रीची तयारी सुरू असताना आरोपींना पकडले. या कारवाईत सुमारे २७७ किलो गोमांस जप्त करण्यात आले.

या प्रकरणात गुजरात प्राणी संरक्षण कायद्यातील सुधारित तरतुदी आणि प्राण्यांना क्रूरतेपासून संरक्षण देणाऱ्या कायद्यासह इतर कलमांखाली आरोपींना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येक आरोपीला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Gujarat Cow Slaughter Case
Aamne Samne: 'फक्त दीड हजारांसाठी तडकाफडकी…', रोहन गुजर-केतकी विलासचा संताप; निर्मात्यांचा मेसेजही केला उघड, पाहा व्हिडिओ

म्हशींची वाहतूक करणाऱ्या मुस्लिम व्यापाऱ्यांना मारहाण

दरम्यान, मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात म्हशींची वाहतूक करणाऱ्या दोन मुस्लिम व्यापाऱ्यांना आणि त्यांच्या वाहन चालकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या काही व्यक्तींनी या व्यापाऱ्यांना अडवले. त्यांनी म्हशी चोरल्याचा संशय व्यक्त करत व्यापाऱ्यांना मारहाण केली.

Gujarat Cow Slaughter Case
Best Indian Web Series: मिर्झापूर-द फॅमिली मॅन टॉप 3 मधून OUT! मग गेल्या गेल्या 10 वर्षांतील नंबर 1 वेब सीरिज कोणती? पाहा यादी

या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये जमावाने दोन्ही व्यापाऱ्यांना बांधून शेतातून ओढत नेल्याचे आणि काठ्यांनी मारहाण केल्याचे दिसत आहे. या प्रकरणी काही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या व्हिडीओंच्या आधारे काही संशयितांची ओळख पटवण्यात आली असून, त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news