GTA 6 Launch India: 13 वर्षांची प्रतीक्षा संपली! GTA 6 मध्ये असं काय आहे खास, ज्याची होतेय जगभर चर्चा? भारतात किंमत किती?

GTA 6 Launch India Price: बहुप्रतीक्षित GTA 6 गेम 19 नोव्हेंबर रोजी जगभरात लाँच झाला असून, भारतात त्याची किंमत 5,999 रुपयांपासून सुरू आहे.
GTA 6 Launched Worldwide
GTA 6 Launched WorldwidePudhari
Published on: 
Updated on: 

GTA 6 Launch India Price: जगभरातील गेमप्रेमी गेल्या 13 वर्षांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. रॉकस्टार गेम्सचा बहुचर्चित ओपन-वर्ल्ड गेम ‘ग्रँड थेफ्ट ऑटो 6’ (GTA 6) गुरुवारी (19 नोव्हेंबर) जगभरात लाँच झाला. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12 वाजल्यापासून PlayStation 5 आणि Xbox Series X|S या गेमिंग कन्सोलवर हा गेम खेळण्यासाठी उपलब्ध आहे. भारतात या गेमच्या स्टँडर्ड एडिशनची किंमत 5,999 रुपये, तर अल्टिमेट एडिशनची किंमत 7,499 रुपये आहे.

GTA 6 ची किंमत किती?

भारतात GTA 6 दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये स्टँडर्ड एडिशनसाठी 5,999 रुपये, तर अल्टिमेट एडिशनसाठी 7,499 रुपये मोजावे लागणार आहेत. दोन्ही एडिशनच्या किमतीत 1,500 रुपयांचा फरक आहे. अल्टिमेट एडिशनमध्ये अतिरिक्त डिजिटल कंटेंट आणि गेममधील काही विशेष सुविधा मिळणार आहेत.

कोणत्या डिव्हाइसवर खेळता येणार?

सध्या GTA 6 हा गेम केवळ PlayStation 5 आणि Xbox Series X|S या कन्सोलसाठी उपलब्ध आहे. PC, Android आणि iOS साठी गेमची आवृत्ती अद्याप लाँच झालेली नाही. त्यामुळे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या GTA 6 Free Download, PC Build किंवा Mobile APK अशा लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा बनावट लिंकद्वारे वैयक्तिक माहिती आणि डेटाला धोका निर्माण होऊ शकतो.

GTA 6 Launched Worldwide
Ramayana Movie Controversy: ‘रामायण’ चित्रपट अडचणीत! रावण आणि राम-लक्ष्मणांच्या चित्रणावरून हिंदू संघटनांचा संताप; बहिष्काराची मागणी

गेम डाउनलोड करण्यासाठी किती जागा लागणार?

GTA 6 हा मोठ्या आकाराचा ओपन-वर्ल्ड गेम असल्याने तो डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी मोठ्या स्टोरेजची आवश्यकता आहे. या गेमसाठी सुमारे 212 GB जागा लागणार आहे. 10 नोव्हेंबरपासून गेमचे प्री-लोडिंग सुरू झाले होते. त्यामुळे गेम डाउनलोड करण्यापूर्वी आपल्या PS5 किंवा Xbox कन्सोलमध्ये पुरेशी जागा उपलब्ध असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

GTA 6 कुठून डाउनलोड करता येणार?

GTA 6 डाउनलोड करण्यासाठी PlayStation Store किंवा Xbox Store या अधिकृत प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल. या स्टोअरमधून गेम खरेदी करून तो आपल्या कन्सोलवर डाउनलोड करता येणार आहे.

GTA 6 Launched Worldwide
Gold Silver Price Crash: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! सोनं 62 हजारांनी स्वस्त, चांदीचे भावही कोसळले; आणखी घसरण होणार?

काय आहे GTA 6 ची स्टोरी?

GTA 6 ची कथा अमेरिकेतील काल्पनिक ‘लिओनिडा’ या राज्यात घडते. या गेममध्ये जेसन डुवाल आणि लुसिया कॅमिनोस हे दोन मुख्य पात्र आहेत. ‘लिओनिडा’ या राज्यात एका लुटीची घटना घडते आणि त्यानंतर दोघेही मोठ्या गुन्हेगारी कटात अडकतात. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना एकमेकांवर अवलंबून राहावे लागते.

या गेममध्ये मियामी शहरावर आधारित ‘व्हाइस सिटी’ हे काल्पनिक शहरही पाहायला मिळणार आहे. याशिवाय अनेक नवीन ठिकाणे, पात्रे आणि वन्यजीवांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीच्या भागांच्या तुलनेत अधिक मोठे आणि तपशीलवार गेमिंग अनुभवण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे.

ब्लिंकिटवरूनही मागवता येणार GTA 6

GTA 6 ची फिजिकल बॉक्स आवृत्ती खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ब्लिंकिटने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र, या बॉक्समध्ये गेमची प्रत्यक्ष डिस्क मिळणार नाही. त्याऐवजी गेम डाउनलोड करण्यासाठी डिजिटल कोड दिला जाणार आहे. हा कोड वापरून खेळाडूंना आपल्या गेमिंग कन्सोलवर गेम डाउनलोड करता येईल. या कोड असलेल्या बॉक्सची डिलिव्हरी 12 नोव्हेंबर रोजी सुरू झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.