Greater Nicobar Project: ग्रेटर निकोबार ठरणार भारताचं होर्मुझ... चीनच्या अर्थव्यवस्थेला थेट आव्हान

Greater Nicobar Project
Greater Nicobar Projectpudhari
Published on
Updated on

Greater Nicobar Project: भारताचं दक्षिणेतील सर्वात शेवटचं टोक म्हणजे ग्रेटल निकोबार बेट! हे बेट मलेशिया आणि इंडोनेशियाच्या अगदी जवळ आहे. भारत सरकारने या बेटाचा कायपालट करण्यासाठी तब्बल ९ अब्ज युएस डॉलरच्या प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रोजेक्टअंतर्गत अंदमान आणि निकोबार बेट समुहांना एक सागरी आणि आर्थिक केंद्रामध्ये रूपांतरित करण्यात येईल.

जवळपास १६६ स्क्वेअर किलोमीटरमधील हा प्रोजेक्ट या बेटांवर एक ट्रांसशिपमेंट पोर्ट, एक नागरिक आणि सैन्य हवाई तळ, एक पॉवर प्लांट, पर्यटनाच्या दृष्टीकोणातून पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ३ लाख ५० हजार लोकांची एक टाऊनशिप देखील तयार करण्यात येईल. हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी जवळपास तीस वर्षे लागणार आहेत. याचा पहिला टप्पा हा २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Greater Nicobar Project
Narendra Modi tour | धावत्या भेटीतला मास्टरस्ट्रोक

भारताला काय फायदा?

सध्याच्या घडीला भारतीय बंदरांवर मोठ्या जहाजांसाठी खोल पाण्यात असलेली बर्थ कमी आहेत. त्यामुळं माल कोलंबो किंवा सिंगापूरच्या समुद्री मार्गाने पाठवला जातो. यामुळं भारताचे मोठे आर्थिक नुकसान होते. ज्यावेळी ग्रेटर निकोबार प्रोजेक्ट तयार होईल त्यावेळी १४.२ मिलियन टीईयू असलेले आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल शिपमेंटबाबतचे भारताचे दुसऱ्या देशांवर असेले अवलंबत्व फक्त संपणार नसून हिंदी महासागरातील एक महत्वाच्या समुद्री रस्त्यावर नजर देखील ठेवता येणार आहे. यामुळं मलक्का सामुद्रधुनीच्या जवळ भारताला एक रणनैतिक ग्रीप देखील मिळणार आहे.

Greater Nicobar Project
Siliguri Corridor |आता 'चिकन नेक' होणार आणखी मजबूत ! प. बंगालचे मुख्‍यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी घेतला मोठा निर्णय

चीनची मलक्का

मलक्का हा एक महत्वाचा समुद्री मार्ग आहे. मार्ग दक्षिण चीनच्या मार्गाने हिंदी महासागराला पॅसिफिक महासागराशी जोडतो. हा जगातील सर्वात महत्वाचा शिपिंग मार्ग आहे. या मार्गातून जवळपास जागतिक समुद्री व्यापाराचा २५ टक्के आणि जागतिक पेट्रोलियम पदार्थांचा ३० टक्के व्यापार या मार्गातून होते.

चीनने या मार्गावरील आपले अवलंबत्व कमी करण्यासाठी लोम्बोक आणि सुंडा स्ट्रेटमधून जाणारा जलमार्ग विकसित केला आहे. मात्र हे मार्ग १८०० ते ३००० हजार किलोमीटर अंतर वाढवतात. त्यामुळं चीनमधील कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या आयातीवरील खर्च आणि वेळ वाढतो.

चीनने मलक्का स्ट्रेट सोडून इतर समुद्री मार्ग विकसित करण्यासाठी प्रयत्न केले. यात चीन - पाकिस्तान इकॉनॉमिकल कॉरिडोअरचा देखील समावेश होता. मात्र अमेरिका - इराण युद्ध आणि त्यानंतर होर्मुझ स्ट्रेटचा आर्थिक हत्यारासारखा झालेला वापर यामुळं मलक्का हा भविष्यात चोकपॉईंट ठरू शकतो.

Greater Nicobar Project
Donald Trump XI Jinping: ट्रम्प-जिनपिंग भेट: नव्या जागतिक समीकरणांची चाहूल?

भारताची रणनैतिक चाल

काही महिन्यांपासून भारत सरकारने ग्रेट निकोबार बेटाचे रणनैतिक महत्व अधोरेखित केलं आहे. मे महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वक्तव्यानुसार सरकारने ग्रेट निकोबार प्रोजेक्ट एक स्ट्रॅटेजिक प्रोजेक्ट असून याचा उद्देश हा अंदमान समुद्र आणि दक्षिण पूर्व आशियामधील भारताची उपस्थिती अजून मजबूत करणे हा आहे. ही योजना भारताची राष्ट्रीय सुरक्षा, रणनैतिक आणि संरक्षण उपस्थिती वाढवणार आहे.

जाणकारांच्या मते या बेटांचा विकासाचे रणनैतिक महत्व आहे. हे ठिकाण मलक्काच्या अगदी तोंडावर आहे. भारतीय नौदलाचे माजी वाईस चीफ शेखर सिन्हा यांनी अल जजीराला सांगितलं की, ही मलक्का स्ट्रेटमधून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व ट्रॅफिकवर नजर ठेवण्यासाठी एक उत्तम जागा आहे.

याद्वारे भारताला सागरी क्षेत्रातील घडामोडींच्याबाबत अप्पर हँड मिळणार आहे. यामुळे समुद्रात होणाऱ्या सर्व घडामोडी ट्रॅक करणे सोपे होणार आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टशी बोलताना माजी ब्रिगेडियर संजय अय्यर यांनी देखील, 'अंदमान निकोबार बेट समुह एक लष्करी आणि आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याने भारताला पूर्व हिंदी महासागरात कधी कधी गस्त घालण्याऐवजी एक कायमचे तळ मिळणार आहे. या ठिकाणावरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व गोष्टींवर नजर ठेवता येणार आहे. त्यामुळं भारताकडं चांगली माहिती असेल.' असं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news