Success Story: आर्थिक तंगी, शाळा सुटली; भाऊजींकडे नोकरी केली! साकलवरून लोणी विकणारा कसा बनला १००० कोटी रूपयाच्या कंपनीचा मालक

Success Story
Success Storypudhari
Published on
Updated on

Success Story Of GR Balasubramaniam: कष्ट करण्याची इच्छा असेल तर कोणतेही आव्हान पार करू शकतो असे म्हटले जाते. अशीच एक गोष्ट जीआरबी डेअर फूड्सचे फाऊंड जीआर बालासुब्रमण्यम यांची आहे. त्यांना आर्थिक अडचणींमुळे शाळा अर्ध्यातून सोडावी लागली होती. नोकरी करावी लागली, घरोघरी जाऊन ते लोणी विकत होते. मात्र आता त्यांनी जीआरबी डेअर फूड्सचा १००० कोटी रूपयांचा व्यवसाय उभा करून गरूड भरारी घेतली आहे.

Success Story
MPSC success story : पेणच्या पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांची यशोगाथा

नोकरी सोडून लोणी विकलं

जीआरबी डेअर फूड्सचे संस्थापक जीआर बालासुब्रमण्यम यांची ही यशोगाथा आजच्या तरूणांना चांगलीच प्रेरणादायी आहे. तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणतीही उंची गाठू शकता. ज्यावेळी बालासुब्रमण्यम यांनी जीआरबीची स्थापना केली. बालासुब्रमण्यम हे तमिळनाडूमधील पलानी मध्ये छोटे गाव चिन्ना कराडपट्टी येथील रहिवासी आहेत. बालासुब्रमण्यम हे सहा मुलांच्या मोठा कुटुंबात वाढले. १३ व्या वर्षी त्यांना आर्थिक अडचणींमुळे शाळा सोडावी लागली. ते पोटापाण्यासाठी बंगळुरू इथं आले.

Success Story
MPSC Success Story | जिद्द, परिश्रम अन् आत्मविश्वास! चिखलआंबेच्या शीतलने मिळवले एमपीएससीत घवघवीत यश

बालासुब्रमण्यम यांचे वडील शेतकरी होते. ते कृषी उत्पादने आपल्या सायकलवरून गावागावात जाऊन विकत होते. बंगळुरूमध्ये जवळपास १४ वर्षे त्यांनी आपल्या भाऊजींच्या लोण्याच्या दुकानात नोकरी केली. त्यानंतर त्यांना काहीतरी नवीन करण्याचा विचार आला. त्यांनी नोकरी सोडून दिली.

ज्यावेळी त्यांनी नोकरी सोडली त्यावेळी त्यांच्या खिशात फक्त ६ हजार रूपये होते. या पैशाचा वापर त्यांनी लोणी व्यापारात केला. तिथूनच जीआरबी डेअर फूड्स कंपनीचा पाया रचला गेला.

Success Story
Vishwas Jhargad success story : आई-वडिलांची माया हरपली… पण स्वप्नांची वाट नाही

अनुभव अन् कष्टाचं चीज झालं

भाऊजींच्या व्यापारात मदत करणाऱ्या बालासुब्रमण्यम यांनी लोण्याचा व्यवसाय आणि त्यातील बारकावे शिकून घेतले होते. त्यानंतर त्यांनी आपली कंपनी सुरू केली. या अनुभवाचा फायदा त्यांना आपल्या व्यवसायात झाला. त्यांनी छोट्या उत्पादकांकडून माल खरेदी करून बंगळुरूमध्ये विकण्यास सुरूवात केली. लोण्याचे रूपांतर तुपात करून पॅकेजिंगवर भर देत त्यांनी आपला प्रोडक्ट बाजारात उतरवला. एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेला हा व्यवसाय पुढं खूप मोठा झाला.

बालासुब्रमण्यम यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एक चिट फंड कंपनी स्थापन केली. याची पद्धत देखील त्यांनी आपल्या भाऊजीच्या व्यसायातून शिकली होती. त्यांनी आपल्या ओळखीतल्या लोकांना हे मॉडेल समजावून सांगितलं.

यातून गोळा केलेले पैसे त्याने लोण्याच्या धंद्यात लावले. त्यांच्याकडे नाशवंत प्रकारात मोडणाऱ्या लोण्याचे आव्हान होते. म्हणून त्यांनी लोण्यापासून तूप बनवून ते विकण्यास सुरूवात केली. हळूहळू उत्पन्न आणि वर्कफोर्स वाढू लागला.

Success Story
Beed Farmer Success Story | दीड एकरातील डाळिंब बागेतून २३ लाखांचे उत्पादन; धामणगावच्या शेतकऱ्याचा आदर्श प्रयोग

बंगळुरूमध्ये पहिली फॅक्ट्री आता ४० देशात विस्तार

जीआरबी डेअर फूड्सची पहिली फॅक्टरी १९९१ मध्ये बंगळुरूमध्ये एका खोलीत सुरू करण्यात आली होती. त्यानंतर डिंडीगुल, होसुरमध्ये प्लांट लावण्यात आले. त्यांनी पॅकेज्ड तूपासह इतर डेअरी प्रोडक्ट्स देखील आपल्या व्यवसायात जोडले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. जीआरबी डेअरी फूड्सच्या वेबसाईटवर नजर टाकली तर आता ही कंपनी १००० कोटी रूपयांचे मूल्य असलेली कंपनी आहे. त्यांची उत्पादने जगातील ४० देशात विकली जातात. आता त्यांच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये ७० पेक्षा जास्त डेअरी उत्पादने आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news