Govt Hike Tax Petrol Diesel: पेट्रोल अन् डिझेलबाबत सरकारचा मोठा निर्णय... अचानक वाढवला टॅक्स

Petrol, Diesel
Petrol, Diesel Pudhari
Published on
Updated on

Govt Hike Tax Petrol Diesel: अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा लष्करी संघर्ष वाढल्यामुळं मध्य पूर्व आशियात पुन्हा तणाव वाढला आहे. त्यामुळं कच्च्या तेलाच्या किंमती वेगाने वाढत आहेत. कच्चं तेल महाग झालं असून भारत सरकारनं देखील पेट्रोल डिझेल बाबत मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने डिझेल आणि विमान वाहतूकीसाठी लागणाऱ्या ATF च्या आयातीवर लावण्यात आलेला विंडफॉल टॅक्स मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. सरकारने हा कर ७ रूपये प्रती लिटरने वाढवला आहे. सरकारने याबाबत दिलेल्या आदेशात हा कर वाढवण्यामागे कच्च्या तेलांच्या किंमतीत झालेली वाढ कारणभूत आहे असं सांगितलं.

Petrol, Diesel
Petrol Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी भडकणार? अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याने तज्ज्ञांचा इशारा!

आता किती कर लागणार?

रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार सरकारने डिझेलच्या निर्यातीवर आतापर्यंत ८.५ रूपये प्रती लीटर टॅक्स वरून वाढवून थेट १५.५ रूपये प्रती लीटर टॅक्स केला आहे. एविएशन टर्बाईन फ्युअलवर विंडफॉल टॅक्स ७.५ रूपये प्रती लीटरवरून वाढवून १४.५ रूपये प्रती लीटर करण्यात आलं आहे. टॅक्सचे वाढलेले दर हे गुरूवार १६ जुलैपासून लागू होणार आहे. मात्र पेट्रोलवर लावण्यात आलेला विंडफॉल टॅक्स कमी केला आहे. हा कर प्रती लीटर ४ रूपयांनी कमी केला आहे.

Petrol, Diesel
Petrol Price Hike In India: कच्चे तेल ८० डॉलरच्याही खाली, तरी पेट्रोलची दरवाढ मागे नाही; केंद्रीय मंत्र्यांनी थेटच सांगितलं

नुकतेच कर केला होता कमी

यापूर्वीही अनेकवेळा जागतिक परिस्थिती चिंचाजनक झाल्यावर कच्च्या तेलाच्या किंमती वेगाने वाढल्या होत्या. त्यावेळी देखील सरकाराने असे निर्णय घेतले होते. मात्र ज्यावेळी अमेरिका इराण यांच्यात शातंता करार झाला होता त्यावेळी सरकाराने एक्सपोर्टवर विंडफॉल टॅक्स वाढवला होता.

Petrol, Diesel
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात; 1 जुलैपासून पेट्रोल 5 रुपये, तर डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त

सामान्यांवर काय परिणाम?

पेट्रोल डिझेलवर टॅक्स वाढण्याचा निर्णयाचा सामान्यांवर काय परिणाम होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर या करवाढीचा सामान्यांवर काही परिणाम होणार नाही. विंडफॉल टॅक्स सरकारकडून कंपन्यांवर लावला जातो. याचा उद्येश स्थानिक बाजारातील इंधनाची उपलब्धता सुरळीत रहावी असा असतो. निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय किंमतींचा अवास्तव फायदा घेण्यापासून रोखण्याचा हा प्रयत्न असतो. त्यामुळं सरकराने या निर्णयामुळं देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही वाढ होणार नाही असं सांगितलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news