Vasundhara Police Outpost Blast: गाझियाबाद दहशतवादी हल्ला? वसुंदरा चौकीतील स्फोटाची तहरीक-उल-मुजाहिदीनने घेतली जबाबदारी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर गाझी २ या हँडलने गाझियाबादमधील स्फोटाची जबाबदारी घेत असल्याचे पोस्ट केली.
Vasundhara Police Outpost Blast
Vasundhara Police Outpost Blastpudhari
Published on: 
Updated on: 

Ghaziabad Vasundhara Police Outpost Blast: दिवाळीपूर्वी गाझियाबाजमध्ये दहशतवादी कट रचल्याचं समोर आलं आहे. वसुंधरा चौकीमध्ये झालेल्या एका स्फोटाची जबाबदारी तहरीक - उल - मुजाहिदीन नावाच्या एका संघटनेनं घेतली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर गाझी २ या हँडलने गाझियाबादमधील स्फोटाची जबाबदारी घेत असल्याचे पोस्ट केली.

Vasundhara Police Outpost Blast
Uri Terror Attack | उरी हल्ल्याची दशकपूर्ती अन्‌ नवा भारत

पोलीस होते रडारवर

उत्तर प्रदेश एटीएस आणि आयबीची टीम घटनास्थळी पोहचली आहे. इंदिरापूरम पोलीस ठाण्याच्या वसुंधरा चौकीत शुक्रवारी रात्री झालेल्या एका स्फोटात डिलिव्हरी बॉय जखमी झाला होता. या स्फोटात चौकीच्या काचा फुटल्या होत्या.

दमरम्यान तहरीक - उल - मुजाहिदीन संघटनेने दावा केला की गाझियाबादमधील भगव्या शासनाचा विरोध करत पोलिसांना टार्गेट करण्यात आलं. आम्हीला आमच्या घरांचे, मस्जिद, दीन आणि संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी लढण्याच हक्क आहे. आम्ही सध्याच्या सरकारला नाजायज मानतो. पुढे देखील हक्काची लढाई सुरूच ठेवली जाईल.

Vasundhara Police Outpost Blast
Kulgam Terror Attack | ‘लक्ष्यवेधी हत्यांचे’ आव्हान

नेमकं काय घडलं?

डीसीपी रिजुल कुमार यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की ६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमारात इंदिरापूरम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या वसुंधरा पोलीस चौकीत एक स्फोट झाला. या स्फोटात दोन खिडक्यांच्या काचा फुटल्या. भेगा पडल्या. घटना घडली त्यावेळी चौकीत पोलीस उपस्थित होते मात्र त्यांना कोणती इजा झाली नाही. मात्र काचेचा तुकडा लागल्याने डिलिव्हरी बॉयच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती ठीक आहे.

Vasundhara Police Outpost Blast
Anantnag Terror Attack | अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांची घरे केली उद्ध्वस्त

डीसीपी काय म्हणाले?

दरम्यान तहरीक उल मुजाहिदीन नावाच्या एका संघटनेनं सोशल मीडियावर या घटनेची जबाबदारी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याबाबत बोलताना डीसीपींनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनास्थळावरून विस्फोटक, दारूगोळा अशी कोणती सामुग्री सापडलेली नाहीये. डॉग स्क्वाडच्या तपासणीत देखील असं काही आढळून आलेलं नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.