Anantnag Terror Attack | अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांची घरे केली उद्ध्वस्त

सुरक्षा दलांची कारवाई; लष्कर-ए-तोयबामध्ये होते सक्रिय
Anantnag Terror Attack  |
Anantnag Terror Attack | अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांची घरे केली उद्ध्वस्तFile Photo
Published on
Updated on

अनिल साक्षी

जम्मू : दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादविरोधी मोहिमेअंतर्गत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित आदिल अहमद ठोकर आणि हारून राशिद गनई यांच्या निवासस्थाने उद्ध्वस्त करण्यात आली.

बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई पोलिस, १ राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ९० व्या बटालियनने संयुक्तपणे केली. दहशतवादाशी संबंधित पायाभूत व्यवस्था आणि त्यांना मिळणारी मदत नष्ट करण्याच्या उद्देशाने सुरक्षा यंत्रणांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. अनंतनागमधील लाल चौक परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस कॉन्स्टेबल आशिक कुरैशी यांचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. कुरैशी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पथकाचा भाग होते.

३ हजार जण ताब्यात

अनंतनाग हल्ल्यानंतर या मोहिमेअंतर्गत 3 हजार संशयित ओव्हरग्राऊंड वर्कर्स आणि इतर संशयितांची चौकशीसाठी धरपकड करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात, विशेषतः यात्रेच्या मार्गांवर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे.

आदिल ठोकरचे घर दुसऱ्यांदा पाडले

अनंतनाग जिल्ह्यातील गुरी येथील रहिवासी आदिल अहमद ठोकर याचे नवे घर गुरुवारी पहाटे स्फोटकांच्या साहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. एका वर्षात ठोकरच्या कुटुंबाच्या मालमत्तेवर दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली. यापूर्वी २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तीन दिवसांनी त्याच्या वडिलोपार्जित घरावर कारवाई केली होती.

हारून गनईच्या घरावर कारवाई

दुसऱ्या मोहिमेत बिजबेहरा भागातील हसनपोरा तवेला येथील रहिवासी हारून राशिद गनई याचे एकमजली घर उद्ध्वस्त करण्यात आले. गनई हा २०१८ पासून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news