Viral Gen Z Student Video: डान्स केला म्हणून भाजपची टीका; विद्यार्थिनीने दिलं भन्नाट उत्तर, राहुल गांधींनीही शेअर केला व्हिडिओ

विद्यार्थी आंदोलनादरम्यान नृत्य केल्यामुळे भाजपकडून टीका केली जात असलेल्या एका विद्यार्थिनीने दिलेले प्रत्युत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Urwashi Palandurkar
Urwashi PalandurkarUrwashi Palandurkar Instagram
Published on
Updated on

Viral Gen Z student video Urwashi Palandurkar

नवी दिल्ली: नीट पेपरफुटीविरोधातील नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान नृत्य केल्यामुळे भाजपकडून टीका केली जात असलेल्या एका विद्यार्थिनीने दिलेले प्रत्युत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. उर्वशी पलांडूरकर या विद्यार्थिनीच्या या व्हिडिओचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि कॉकरोच जनता पार्टीनेही कौतुक केले आहे.

विद्यार्थी आंदोलनादरम्यान काही विद्यार्थी नृत्य करत रील तयार करत असल्याचा व्हिडिओ भाजपच्या छत्तीसगड युनिटने गुरुवारी सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये दुसऱ्या बाजूला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणाऱ्या एका विद्यार्थ्याचा व्हिडिओही दाखवण्यात आला होता. या पोस्टला "Gen Z ची कोणती विचारसरणी तुम्ही निवडाल?" असे कॅप्शन देण्यात आले होते. तसेच काही विद्यार्थी "बाबरच्या वारशावर नाचतात" असा टोला लगावण्यात आला होता.

Urwashi Palandurkar
Noida girl apology: पंतप्रधान मोदींविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नोएडातील मुलीचा व्हिडीओ व्हायरल

भाजपने संमतीशिवाय व्हिडिओ वापरल्याचा आरोप

भाजपची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आंदोलनातील व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या विद्यार्थिनींपैकी उर्वशी पलांडूरकर हिने प्रतिक्रिया दिली. तिच्या परवानगीशिवाय तिचा व्हिडिओ वापरण्यात आल्याचा आरोप तिने केला. मात्र संतप्त प्रतिक्रिया देण्याऐवजी उर्वशीने मिश्किल शैलीत पीपीटी सादरीकरण तयार करत भाजपच्या पोस्टमधील दाव्यांना उत्तर दिले. तिच्या विनोदी, उपरोधिक आणि आत्मविश्वासपूर्ण उत्तरामुळे तिचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले जात आहे. 'कॉकरोच जनता पार्टी' आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही तिचे कौतुक केले आहे.

छत्तीसगड भाजपने शेअर केलेल्या व्हिडिओची कॅप्शन आणि त्यातील मजकूर यांबाबत उर्वशीकडे अनेक मुद्दे होते आणि तिने ते सर्व एका पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मांडले. "तुमची कॅप्शन लिहिण्याची पद्धत खूपच कमकुवत आहे. तुमचा चॅटजीपीटी तुम्हाला चांगले प्रतिसाद देत नाही," अशा शब्दांत उर्वशीनेे सुरुवात केली. तिने पुढे असेही म्हटले की, बाबरचा वारसा ही टीका फारशी समर्पक वाटली नाही. तसेच, 'फोडा आणि राज्य करा' हे धोरण २०२६ मध्ये यशस्वी ठरणार नाही, विशेषतः अशा पिढीवर जी संसद सदस्यांना 'जेन झेड' शब्दप्रयोग शिकवत आहे. अलीकडेच संसदेत 'क्लॉक्ड इट', 'फोमो', 'एमआयए' आणि 'डेलुलू' यांसारख्या शब्दांचा वापर झाला होता, त्याकडेच तिने हा संदर्भ दिला.

'९३ टक्के गुण मिळवले, नृत्यही करते'

उर्वशीने आपण दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांमध्ये ९३ टक्के गुण मिळवले असल्याचे सांगितले. शैक्षणिक यश आणि नृत्यासारख्या सहशालेय उपक्रमांमध्ये सहभाग हे एकत्र शक्य असल्याचेही तिने ठामपणे मांडले.

राहुल गांधी, केजरीवाल आणि CJP कडून कौतुक

उर्वशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तिच्या व्हिडिओवर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी "देव तुझे भलं करो, बाळा. तुझा सकारात्मक दृष्टिकोन खूप आवडला," अशी प्रतिक्रिया दिली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही उर्वशीचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत तिच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. सीजेपीने देखील तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

Urwashi Palandurkar
CJP Protest Viral Reel: एक व्हायरल रील अन् 6 लाख फॉलोअर्स... CJPच्या आंदोलनातील एका रिलने बदललं 19 वर्षाच्या अभिनवचं आयुष्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news